घरठाणे....तर आता पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील; आव्हाडांचे ट्वीट व्हायरल

….तर आता पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील; आव्हाडांचे ट्वीट व्हायरल

Subscribe

ठाणे : ठाणे महापालिकेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही योजनांचा शनिवारी सकाळी शुभारंभ होत आहे. त्याचे आमंत्रण असताना ‘न गेलेले बरे’ असे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. या कार्यक्रमात गेल्यास आता पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

- Advertisement -

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गेल्या महिन्यात भाजपा महिला मोर्चाच्या एका पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला होता. त्यावरून राजकीय वातावरण तापले होते. एकवेळ खुनाचा गुन्हा चालला असता, पण विनयभंगाचा मान्य नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्वीट केले आहे.

ब्रिजच्या उद्घाटनात मुख्यमंत्र्यांपासून 8 फूट अंतरावर असताना आपल्यावर 354चा गुन्हा दाखल झाला होता. आज त्यांच्या बाजूला उभा राहीन आणि पोलीस पाकिट मारल्याचा गुन्हा दाखल करतील अशी भीती व्यक्त करताना चलो ये वक्त भी गुजर जयेगा…, असे जितेंद्र आव्हाड यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

मुंब्रा येथील ब्रिज उद्धाटन प्रसंगी आमदार आव्हाड यांच्यावर 354चा गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः साक्षीदार होते. त्यामुळे आज त्यांच्या बाजूला उभा राहीन आणि पोलीस पाकीट मारल्याचा गुन्हा दाखल करतील. त्यापेक्षा कार्यक्रमाला न गेलेले बरं. परत पोलीस म्हणतील दबाव होता आणि सीएम म्हणतील, तुला माहीत आहे ना मी हे करू शकत नाही… तुला कसं कळत नाही… खरंच कळत नाही…, अशी कोपरखळी देखील त्यांनी मारली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -