…म्हणून पंकजांना विधान परिषदेची उमेदवारी नाही, फडणवीसांनी सांगितलं ‘कारण’

विशेष म्हणजे तिथे आता थोड्याच दिवसांत इलेक्शन आहेत. तसेच आम्ही सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतो, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका, असंही देवेंद्र फडणवीसांना पत्रकारांनी पंकजांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलंय

devendra fadanvis

मुंबईः पंकजा मुंडे मध्य प्रदेशचा प्रभार सांभाळत आहेत. तिथे आता इलेक्शन आहेत, आम्ही एकमेकांच्या संपर्कात असतो, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणालेत. देवेंद्र फडणवीसांना पंकजा मुंडेंना विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी डावलल्याचं पत्रकारांची छेडले असता, त्यांनी त्याला उत्तर दिलं.

पंकजा मुंडे भाजपच्या मोठ्या नेत्या आहेत. तसेच त्यांच्याकडे सध्या मध्य प्रदेशचा चार्ज आहे. त्यामुळे त्यांना सातत्यानं मध्य प्रदेशला ये-जा करावी लागत असते. विशेष म्हणजे तिथे आता थोड्याच दिवसांत इलेक्शन आहेत. तसेच आम्ही सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतो, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका, असंही देवेंद्र फडणवीसांना पत्रकारांनी पंकजांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलंय.

गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपकडून विधान परिषदेसाठी पाच नावांची घोषणा झाली. त्यात प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, राम शिंदे यांना संधी देण्यात आलीय. परंतु ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडेंना डावलण्यात आलं होतं. त्यामुळे पंकजा मुंडेंचे कार्यकर्तेही नाराज होते. खरं तर पंकजा मुंडे स्वतः विधान परिषदेवर जाण्यास उत्सुक होत्या. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची आशा होती. परंतु ऐन वेळी त्यांना डावलण्यात आल्यानं हा राजकीय चर्चेचा विषय ठरला.

दरम्यान याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना विचारणा केली असता, ते म्हणाले केंद्रीय नेतृत्वानं निर्णय घेतला असून, तो आम्हालाही मान्य करावा लागतो. देवेंद्र फडणवीसांनीसुद्धा पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न केल्याचंही त्यांनी सांगितलं. दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनीच पंकजा मुंडेंचा पत्ता कट केल्या असल्याचंही बोलल जातंय.


हेही वाचाः सैन्य भरतीशी निगडीत अग्निपथ योजनेची घोषणा, सैन्यात ४ वर्षांसाठी तरुणांची होणार भरती