घरमहाराष्ट्र…म्हणून सासऱ्यांचे घर तोडले, नितीन गडकरींनी सांगितला प्रसंग

…म्हणून सासऱ्यांचे घर तोडले, नितीन गडकरींनी सांगितला प्रसंग

Subscribe

मुंबई : केंद्रीय रस्ते महामार्ग व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या कामाची छाप देशभर पाडली आहे. गडकरींच्या नेतृत्वात देशभरात रस्तेबांधणींचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, आज एका खासगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी रस्तेबांधणीच्या कामात येणाऱ्या अडथळ्यांचा उल्लेख करताना सासऱ्यांचे घर तोडण्याचा प्रसंग सांगितला.

खासगी वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी विविध मुद्यांवर आपले मत मांडले. त्यावेळी त्यांना तुम्ही महाराष्ट्रात असताना खूप बुलडोझर चालवला आहे, असे विचारले असता त्यांनी सांगितले की, हो मी बुलडोझर चालवला आहे. तुम्ही नागपूरमध्ये आल्यावर तुम्हाला समजेल की नागपूरमधील सर्व रस्ते रुंद आणि प्रशस्त आहेत. घर तोडल्यामुळे लोकांचा पाठिंबा जास्त मिळतो, याचा मला चांगलाच अनुभव आहे.

- Advertisement -

त्यांना विचारण्यात आले की, घर तोडल्यामुळे कधी तुमचं नुकसान झालय का? यावर नितीन गडकरी म्हणाले की, मी माझ्या सासऱ्याचे घर तोडले होते. नागपूरमध्ये एक नवीनच महिला आएएस अधिकारी आल्या होत्या. मी त्यांना आदेश दिला की, रस्ता मोकळा करण्यासाठी एक लाईन मारा आणि त्या लाईनमध्ये येणारी सर्व घरे तोडा. पक्ष वगैरे, ओळख वगैरे बघू नका. मात्र माझ्या सासऱ्याचे घर मध्ये येत असल्यामुळे त्यांनी मला कल्पना दिली होती. पण मी त्यांना माझ्या आदेशाचे पालन करायला सांगितले.

हे काम कुठल्याही सुडबुद्धीनं केलं नव्हत. घर तोडल्यानंतर माझी पत्नी मला म्हणाली की, तुम्ही आधी कल्पना दिली असती तर आम्हीच घर तोडले असते. पण हे लोकहिताच्या भावनेतून केलेले काम होते. त्यामुळे लोकांनाही आवडले, असेही गडकरी यांनी सांगितले.

- Advertisement -

रस्त्याच्या कामात गडबड झाल्यास बुलडोझर खाली टाकू
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय राष्ट्रीय रस्ते विभागाच्या सांगली पेठ चौपदरीकरण रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितले की,  या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्यानतंर पुढील 25 वर्ष या रस्त्याला एकही खड्डा पडणार नाही, अशा पद्धतीचे काम केले जाईल. मी रस्त्याच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची टक्केवारी घेतलेली नाही. त्यामुळे या रस्त्याच्या कामात ठेकेदारांनी कोणतीही गडबड करता कामा नाही. अन्यथा ठेकेदाराला बुलडोझर खाली टाकू, अशा शब्दात नितीन गडकरींनी दम भरला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -