…म्हणून आमदारांची आणि कुटुंबांची सुरक्षा काढली, शिंदेंचं ट्विट करत ठाकरेंवर बाण

राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असे एकनाथ शिंदे यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मुंबईः शिवसेनेचे जवळपास 40 बंडखोर आमदार हे शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथी होत आहेत. यात आता संपूर्ण पक्षच शिंदे गटात सामील करून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी तयारी केली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी एक नवं ट्विट करत खळबळ उडवून दिलीय. यामध्ये एकनाथ शिंदे यांनी राजकीय आकसापोटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप केला. तसेच या शिवसेना आमदारांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची आहे, या गोष्टीकडेही त्यांनी ट्विटमधून लक्ष वेधले आहे.

राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असे एकनाथ शिंदे यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या ट्विटमुळे राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे, शिंदेंसोबतच्या 40 आमदारांच्या बंडामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.


हेही वाचाः …अन्यथा फडणवीसांच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल, संजय राऊतांचा इशारा