Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र सोशल मीडियामुळे तुटतायत जवळची नाती; क्षुल्लक कारणांवरून वाद विकोपाला

सोशल मीडियामुळे तुटतायत जवळची नाती; क्षुल्लक कारणांवरून वाद विकोपाला

Subscribe

व्हॉट्सअ‌ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुकवर तासनतास खास करून रात्री होणारी चॅटिंग नवरा बायकोच्या नात्यांवर संक्रांत आणत आहे. यातून होणारे भांडण हे थेट घटस्फोटाला कारण ठरत आहे, त्यामुळे सुखी संसारात दुरावा येत आहे.

स्मार्ट फोननं माणसांचं आयुष्यचं बदलून टाकलं आहे. नवी व्हर्च्युअल नाती निर्माण झाली. पण त्यातून घरातील नाती मात्र तुटत असल्याचं समोर येत आहे. कौटुंबिक न्यायालयाच्या आकडेवारीनुसार, 30 टक्के घटस्फोट हे केवळ सोशल मीडियाच्या वापरामुळे निर्माण झालेल्या वादातून होत आहेत. ( Social Media Close Relationships Caused by Social Media Avoid disputes over trivial reasons )

व्हॉट्सअ‌ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुकवर तासनतास खास करून रात्री होणारी चॅटिंग नवरा बायकोच्या नात्यांवर संक्रांत आणत आहे. यातून होणारे भांडण हे थेट घटस्फोटाला कारण ठरत आहे, त्यामुळे सुखी संसारात दुरावा येत आहे. कधी कधी तर अगदी क्षुल्लक कारणांवरून भांडण होतात. समोर आलेल्या माहितीनुसार, काही जोडपी तर त्यांच्या जोडीदाराने एखाद्या स्त्री वा पुरुषाचा फोटो लाइक केला, त्याला कमेंट केली तर त्यावरूनसुद्धा भांडण करतात. मीरा-भाईंदरमध्ये तर महिला सहायता कक्षाकडे जानेवारी ते जुलै 2023 या सात महिन्यांत 730 तक्रारी आल्या.

पोलिसांचं म्हणणं काय?

- Advertisement -

व्हॉट्सअ‌ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक, मेसेज वा कॉलिंगच्या माध्यमातून अन्य स्त्री-पुरुषांसोबत चालणारे संभाषण, चॅटिंग हे संशयास्पद वाटले तर सहाजिकच जोडीदाराच्या मनात संशय निर्माण होतो. संशयाचे भूत एकदा मनात घर करून गेलं की संसारावर विपरीत परिणाम होतो. पोलिसांच्या मते पती- पत्नीमधील निर्माण होणारा संशय आणि त्यातून होणारे वाद यात 90 टक्के मोबाईल आणि सोशल मीडिया कारणीभूत ठरत आहे.

विविध पोलीस ठाण्यांत 111 गुन्हे दाखल

समोर आलेल्या तक्रारींप्रकरणी कुटुंबात सामंजस्य घडवण्याचे प्रयत्न करून सुद्धा महिलेने ज्यांच्याविरुद्ध तक्रार केली ते ऐकत नसल्यास वा समाधान होत नसल्यानं 111 गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल केले आहेत.

- Advertisement -

सहज आणि सुंदर वाटणाऱ्या या व्हर्च्युअल जगाच्या भोवऱ्यात सापडलेल्यांना आपण अडकलोय याची जाणीव होत नाही. जेव्हा ती होते तेव्हा वास्तवात त्यांनी बरंच काही गमावलेलं असतं. ज्याची भरपाई व्हर्च्युअल जगातून होणं शक्य नाही. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना प्रत्येकानं काही नियम पाळणं गरजेचं आहे.

( हेही वाचा: राष्ट्रवादी अजित पवारांना दिली जाईल; संजय राऊतांनी व्यक्त केली भीती )

सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करणं, फोटो शेअर करणं, फोटोत कोण आहे, अशा गोष्टींवरून वाद होतात ते शेवटी घटस्फोटापर्यंत जातात, असं काही तज्ज्ञांचं मत आहे. तसंच, आपलं नात हे पारदर्शक ठेवावं. एकमेकांशी सर्व शेअर केले गेले पाहिजे. पती वा पत्नी मोबाइलचा पासवर्ड एकमेकांपासून लपवून ठेवतात. मग अचानक काही गोष्टी समोर येतात. अनेकदा तसं काही नसल्याचंसुद्धा नंतर आढळून येतं. परंतू, तोपर्यंत वाद बराच वाढलेला असतो, असंही मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

- Advertisment -