नुपूर शर्माच्या समर्थनार्थ मुस्लिम तरुणाने लिहिली पोस्ट, भिवंडी पोलिसांकडून अटक

साद अशफाकने शनिवारी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. नुपूर शर्माने पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे या तरुणाने समर्थन केले आहे.

पैंगबर मोहम्मद यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (BJP suspended spokesperson Nupur Sharma) हिच्या समर्थनार्थ मुस्लिम समाजातील एका तरुणाने पोस्ट लिहिली आहे. या तरुणाने नुपूर शर्माला समर्थन केल्याने भिवंडीतून त्याला अटक करण्यात आली. (Social media Post wrote by a Muslim youth in support of Nupur Sharma, arrested by Bhiwandi police)

हेही वाचा – महिलेविरुद्ध द्वेषाचे खराब प्रदर्शन, वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गौतम गंभीरचे नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ ट्विट

साद अशफाक अंसारी असं या तरुणाचं नाव असून तो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. मी कोणत्याही धर्माचं समर्थन करत नाही, असंही त्याने पोस्टमध्ये म्हटलं होतं. साद अशफाकने शनिवारी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. नुपूर शर्माने पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे या तरुणाने समर्थन केले आहे. यामुळे इतर समुदायातील भावना दुखावल्याचा आरोप या तरुणावर करण्यात आला आहे.

हेही वाचा – बांग्लादेशात नुपूर शर्माविरोधात जोरदार निदर्शने, भारतावर बहिष्कार टाकण्याची मागणी

या तरुणाने लिहिलेली पोस्ट व्हायरल झाल्यानंतर भिवंडी केसरबाग परिसरातील मुस्लिम समुदायातील लोक एकत्र जमले. त्यांनी या मुलाच्या घरात घुसून माफी मागण्याची मागणी केली. तसेच, त्याला कलमा वाचण्यासही सांगण्यात आले. मी कोणत्याही धर्माचं विशेष समर्थन करत नाही, असं या तरुणाने जमावाला सांगितले.

हेही वाचा – केंद्राने नुपूर शर्मा, जिंदालांवर आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी कारवाई करावी; वळसे पाटलांची मागणी

दरम्यान, त्याच्या पोस्टमुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याने त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी येत आहे. हे प्रकरण आणखी तापू नये याकरता पोलिसाने त्याला अटक केली असून धार्मिक भावना भडकवल्याचा आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.