घरमहाराष्ट्रMaharashtra Politics : ठाकरे दाम्पत्याचा वंदे भारतने प्रवास आणि...

Maharashtra Politics : ठाकरे दाम्पत्याचा वंदे भारतने प्रवास आणि…

Subscribe

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील वंदे भारत ट्रेनने आजवर अनेकांनी प्रवास केला आहे. अनेक नेतेमंडळींनी या ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद घेतला. वारंवार मोदींवर टीका करणारे उद्धव ठाकरे यांनीही काल (ता. 05 फेब्रुवारी) कोकण दौरा आटपून वंदे भारतने प्रवास करत मुंबई गाठली. यावेळी रश्मी ठाकरे, खासदार विनायक राऊत, पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर हेही सोबतच होते. पण त्यांच्या या प्रवासावर भाजपाने जोरदार टोला लगावला. ज्यामुळे या दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टोलेबाजी करण्यात येत आहे. X या सोशल मीडियावर हे राजकारण रंगलेले पाहायला मिळत आहे. (Social media war in BJP Thackeray group due to Uddhav Thackeray Vande Bharat journey)

हेही वाचा… राजकारण्यांसोबत गुंडांची फोटो सीरिज; गुंडाराज आल्याचा विरोधकांमध्ये सूर

- Advertisement -

ठाकरे दाम्पत्याने काल खेड ते मुंबई हा प्रवास वंदे भारतने केला. कारण उद्धव ठाकरेंनी रत्नागिरीच्या एका भाषणात मी मोदींना माझा शत्रू मानत नाही, असे म्हटल्यानंतर लगेचच काल खेड ते मुंबई हा प्रवास वंदे भारतने केल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या मनात नेमके काय सुरू आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पण उद्धव ठाकरेंच्या वंदे भारत ट्रेनने केलेल्या प्रवासाचा फोटो भाजपाकडून पोस्ट करण्यात आला आहे. “हीच तर #ModiKiGuarantee. कुठे आहे विकास? म्हणून ओरडणारे उबाठा जेव्हा वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करून लाभार्थी होतात तेव्हा समाधान वाटते”, असा टोला महाराष्ट्र भाजपाच्या X या सोशल मीडियावरील अधिकृत अकाउंटवरून लगावण्यात आला आहे.

या पोस्टनंतर भाजपाकडून आणखी एक पोस्ट करण्यात आली. ज्यामध्ये लिहिले आहे की, “मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी, वंदे भारत ट्रेनचा आरामदायी प्रवास, तिसरी बार… मोदी सरकार!” तर याही पोस्टमध्ये भाजपाने #ModiKiGuarantee असा हॅशटॅग वापरला आहे. एकंदरीतच त्यांनी दोन्ही पोस्टमधून पुन्हा एकदा मोदींचेच सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. पण भाजपाच्या दुसऱ्या पोस्टला ठाकरे गटाकडून रिपोस्ट करून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

- Advertisement -

“कोस्टल रोड, MTHL ही ठाकरेंची गॅरेंटी होती, पण क्रेडिट घेण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची घाई होतेय. MTHL अनेक महिने तयार असूनही उद्घाटनाला विलंब केला आणि आता कोस्टल रोड तयार नसूनही उद्घाटनाची घाई चाललीये. पण तुम्ही कितीही घाई केलीत तरी मुंबईचे हाल करणाऱ्या खोके सरकारला जनतेच्या मनात क्रेडिट मिळणार नाहीच!” असे लिहित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाजपाला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे आता या प्रवासाने आणखी काय वाद रंगतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण तत्पूर्वी प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी रेल्वे ही भारताची संपत्ती आहे, कोणाच्या बापाची संपत्ती नाही, असे म्हणत भाजपावर निशाणा साधला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -