घरCORONA UPDATEदारूविक्रीच्या निर्णयावर अण्णा हजारे म्हणतात...'!

दारूविक्रीच्या निर्णयावर अण्णा हजारे म्हणतात…’!

Subscribe

राज्यावर कोरोनाचं संकट गहिरं होत असताना महसुली उत्पन्नासाठी राज्य सरकारने दारूविक्रीला परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर या निर्णयावर काही लोकांकडून टीका देखील होत आहे तर काहींकडून या निर्णयाचं समर्थन देखील होत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारच्या या निर्णयाचा चांगलाच समाचार घेतला आहे. अण्णा हजारेंनी यासाठी एक पत्रक काढलं असून सरकारवर टीका केली आहे. ‘कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारला अजूनही बऱ्याच गोष्टी करण्याची आवश्यकता असताना फक्त महसुलासाठी सरकारनं दारूची दुकानं सुरू कोली आहेत. ही विनाशकाले विपरीत बुद्धीच आहे’, असं अण्णा हजारेंनी या पत्रात म्हटलं आहे.

दारूमुळे हातातला पैसाही संपेल…

दारूविक्रीच्या निर्णयामुळे सरकारी तिजोरीत जरी पैसा जमा होणार असला, तरी लोकांच्या हातात असलेला पैसाही संपेल, अशी भिती अण्णा हजारेंनी पत्रात व्यक्त केली आहे. ‘या संकटकाळात गरीब माणसाला पैशांची गरज आहे. पण त्याच्याकडे जे काही पैसे शिल्लक आहेत, तेही दारूत खर्च होऊन त्याच्या कुटुंबावर आर्थिक अडचण येऊ शकते. लॉकडाऊनमुळे आधीच गरीबांच्या हाताला काम नसताना त्यांच्याकडे उरलेले पैसेही दारूवर खर्च होऊ शकतात’, असं अण्णांनी पत्रात म्हटलं आहे. ‘गेल्या दीड महिन्यापासून दारूविक्री बंद होती. दारू न पिल्यामुळे लोकांचं काय नुकसान झालं? दारूमधून मिळणाऱ्या महसुलापेक्षाही कोरोनाचा धोका जर अधिक वाढणार असेल, तर याचा काय उपयोग?’ असा सवाल अण्णा हजारेंनी विचारला आहे.

- Advertisement -

पोलिसांवरचा ताण वाढवून ठेवला…

दरम्यान, दारूविक्रीमुळे पोलिसांवरचा ताण वाढल्याचं अण्णा पत्रात म्हणतात. लॉकडाऊनच्या काळात आपल्या कुटुंबियांपासून दूर राहून रस्त्यावर उभं राहात पोलीस आपली ड्युटी करत आहेत. पण दारूविक्रीमुळे गर्दी होऊन पोलिसांवरचा ताण अधिकच वाढला आहे. दारूविक्रीतून मिळणारा महसूल सरकारला लोण्याच्या गोळ्यासारखा दिसत असेल. पण आर्थिक परिस्थिती कठीण असली, तरी कोरोनाला रोखणं आणि लोकांना वाचवणं महत्त्वाचं आहे. या परिस्थितीमध्ये दारूची दुकानं उघडणं अजिबात समर्थनीय नाही. तुम्ही लोकांना वाचवायचा विचार करणार की महसूल गोळा करण्याचा?’ असाही प्रश्न अण्णांनी पत्रात विचारला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -