घरताज्या घडामोडीसामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी ८४ व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास

सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी ८४ व्या वर्षी घेतला अखरेचा श्वास

Subscribe

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी विद्या बाळ यांनी अखेरचा श्वास पुण्यातील खासगी रुग्णालयात घेतला. पुण्यातील नचिकेत या त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. महिलांच्या समान हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून त्यांना ओळखलं जात. तसंच ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकेच्या त्या संपादिका होत्या.

महाराष्ट्रातील स्त्रीवादी चळवळ आणि संस्थात्मक कार्यातून समाजातील मानसिकता बदलण्याचे विद्या बाळ यांनी प्रयत्न केले. लेखिका, पत्रकार आणि महिला कार्यकर्त्या असलेल्या विद्याताईंनी स्त्रियांना समृद्ध जीवन जगता यावे यासाठी पुरुषभान यायला हवं असं म्हणत लिखाणाला कृतीची जोड दिली. याचबरोबर त्यांनी ‘सखी मंडळा’ची देखील स्थापना केली. तसंच विद्या बाळ यांच्या ‘नारी समता मंच’ यामाध्यमातून त्यांनी अ‍ॅसिड हल्ल्यांविरोधात जागृतीसाठी ‘दोस्ती जिंदाबाद’ असे अनेक कार्यक्रम केले.

- Advertisement -

विद्याताई यांना आगरकर पत्रकारिता पुरस्कार, कै. कमल प्रभाकर पाध्ये ट्रस्ट पुरस्कार, कै. शंकरराव किर्लोस्कर पुरस्कार, सामाजिक कृतज्ञता जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले होते.


हेही वाचा – शिवभोजन थाळीसाठी तुफान गर्दी; रांगेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस तैनात

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -