घरमहाराष्ट्रAjit Pawar on Poonam Pandey : पूनम पांडेच्या मृत्यूची अफवा, पण अजित...

Ajit Pawar on Poonam Pandey : पूनम पांडेच्या मृत्यूची अफवा, पण अजित पवारांनी केलं दुःख व्यक्त

Subscribe

सोलापूर : अभिनेत्री आणि मॅाडेल पूनम पांडे हिचे सर्व्हायकल कॅन्सरमुळे निधन झाले, अशी बातमी शुक्रवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून देण्यात आली. पूनम पांडेच्या निधनाने अनेक लोकांना धक्का देखील बसला. मात्र या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर 24 तासांनी पूनम पांडे हिने स्वत: तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर करत “मी जिवंत आहे” अशी बातमी दिली. पूनम पांडेच्या या स्टंटबाजीनंतर आता तिच्यावर टीका होताना दिसत आहे. केवळ सर्वायकल कॅन्सरबद्दल जनजागृती करण्यासाठी हा ‘स्टंट’ केल्याची कबुली तिने दिली. मात्र हे पूनम पांडेच्या निधनाचे अपडेटेड वृत्ताची कल्पना कदाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नव्हती. याचाच अर्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची यामध्ये कुठलीह चूक म्हणता येणार नाही.

सोलापूर शहरातील महानगरपालिका आरोग्य केंद्रात महिला सर्वरोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. दरम्यान अजित पवार यांनी महिलाविषयक आजाराबाबत बोलताना पूनम पांडेच्या मृत्यूचा उल्लेख केला. एक अभिनेत्री होती, पण तिला गंभीर असा आजार झाला, फार कमी वयात ती आपल्याला सोडून गेली. असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा… Poonam Pandey Return : आयएफटीडीए अध्यक्ष पूनम पांडेवर संतापले; कडक कारवाईची मागणी

महिलांना सल्ला देताना अजित पवार म्हणाले की, धकाकधीच्या जीवनात काम करत असताना कधी कोणता आजार होईल, आपल्याला हे सांगात येणार नाही. सकाळी मी आज बातमी वाचली. एक कमी वयाची पांडे म्हणून एक अभिनेत्री होती. तिला पण गंभीर आजारा झाला. ती आपल्याला फार कमी वयात सोडून गेला. तुम्ही सर्वांनी स्वत:ची काळजी घ्या. आम्ही सरकार म्हणून तुमची काळजी घेऊ, महापालिकाही तुमची काळजी घेईल. असं अजित पवार म्हणाले. कार्यक्रम संपल्यानंतर माध्यमांनी रुपाली चाकणकर यांच्या ही बाब लक्षात आणून दिल्यावर किसन जाधव यांच्या घरी स्नेहभोजन करताना पूनम पांडेबाबत माहिती मिळाली, पूनम पांडे अजून हयात आहे, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

- Advertisement -

प्रसिद्ध अभिनेत्री पूनम पांडे हिच्या मृत्यूची अफवा होती. अनेकांनी पूनम पांडेच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर दुःख व्यक्त केले होते. मात्र अचानक पूनम पांडेने स्वतः माध्यमांसमोर येत आपण जिवंत असल्याची माहिती दिल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. सर्वायकल कॅन्सरबद्दल जनजागृती करण्यासाठी हा प्रकार केल्याची कबुली तिने दिली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पूनम पांडेच्या निधनाची माहिती घेतली होती, मात्र ती जिवंत असल्याची माहिती अजित पवारांना नसल्याने त्यांनी भर सभेत दुःख व्यक्त केले.

पूनम पांडेने काय म्हटले?

पूनम पांडेने स्वत: तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर करत “मी जिवंत आहे” अशी बातमी दिली. यावेळी तिने सर्वांची माफी मागताना म्हटले की, “मी जिवंत आहे, सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी हे सर्व केले. हजारो महिलांचा सर्व्हायकल कॅन्सरने मृत्यू होतो. कारण त्यांना माहिती नसतं की काय करायचं, पण हा कॅन्सर बरा होऊ शकतो. फक्त तुम्हाला काही टेस्ट करून एचपीव्ही व्हॅक्सिन घ्यायची असते. सर्व्हायकल कॅन्सरमुळे आपल्याला प्राण गमवावे लागू नये म्हणून आपल्याला हे करायला हवं. आपण एकत्र मिळून या कॅन्सरबाबत जनजागृती करूया. तुम्ही माझ्या वेबसाईटला जरुर भेट द्या. सर्व्हायकल कॅन्सरच्या जनजागृतीसाठी (http:www.poonampandeyisalive) ही वेबसाईट लॅान्च केली आहे,” असं पूनम पांडेनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -