Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ; बार्शीत पोलिसांनी शो बंद पाडला

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ; बार्शीत पोलिसांनी शो बंद पाडला

Subscribe

दहा वाजण्याच्या सुमारास ऐनवेळी बार्शी पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये याची दक्षता घेत डीजे बंद केले आणि कार्यक्रमदेखील बंद पाडायला भाग पाडले.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत गौतमी पाटीलचा शो आयोजित करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड मित्र मंडळ या संस्थेने गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात पुढाकार घेतला होता. शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुरू होणार कार्यक्रम रात्री साडेनऊ दरम्यानच्या सुरु झाला. बार्शी तालुक्यातील शहराच्या मुख्य ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमी पाटीलला यायला उशीर झाल्याने मोठ्या संख्येने प्रेक्षक ताटकळत उभे होते. दहा वाजण्याच्या सुमारास ऐनवेळी बार्शी पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये याची दक्षता घेत डीजे बंद केले आणि कार्यक्रमदेखील बंद पाडायला भाग पाडले. यामुळे गौतमी पाटीलच्या लावणीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या बार्शीकरांना एकाच गाण्यावर समाधान मानावे लागले.(Solapur Barshi Gautami Patil s programmeThe police shut down the show )

साडेनऊच्या सुमारास लावणीला सुरुवात झाली. दहा वाजताच बार्शी पोलिसांनी ताबडतोब डीजे बंद करायला लावला. कार्यक्रमाच्या ठिकाणी रात्री उशिरा कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी किंवा गोंधळ नको अशी भूमिका घेत, पोलिसांनी लावणी कार्यक्रम बंद केला.

- Advertisement -

राजेंद्र गायकवाड मित्र मंडळाच्यावतीने गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमाला 200 रुपये तिकीट आकारण्यात आले होते. तिकीटावर सायंकाळी 7 वाजता कार्यक्रमास सुरुवात होईल, असा उल्लेख होता. त्यामुळे अनेकांनी शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता कार्यक्रमाठिकाणी हजेरी लावली होती. गौतमी पाटीलचा कार्यक्रम सुरु व्हायला रात्रीचे साडेनऊ वाजले. लावणीने कार्यक्रमास सुरुवात होताच 15 ते 20 मिनिंटत पोलिसांनी कार्यक्रम बंद केला. गौतमीच्या चाहत्यांना फक्त एकाच लावणीवर समाधान मानावे लागले.

( हेही वाचा: TMKOC : …म्हणून मी गप्प होते; जेनिफर मिस्त्रींनी नवा व्हिडीओ शेअर करत केला खुलासा )

- Advertisement -

गौतमी पाटीलचा कार्यक्रम पूर्ण न पाहता आल्यामुळे प्रेक्षकांनी हुल्लडबाजी करत नाराजी व्यक्त केली. या प्रेक्षकांनाही पोलिसांनी रोखलं. कार्यक्रमाला झालेली गर्दी आणि प्रेक्षकांची नाराजी बघत पोलिसांनी बंदोबस्तामध्येच गौतमी पाटीलला बाहेर काढलं.

 

- Advertisment -