वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल होताच सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा राजीनामा

श्रीकांत देशमुख हे सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी काँग्रेस आणि जनसुराज्य पक्षासाठी काम केले आहे

solapur bjp district president shrikant deshmukh resigns after controversial video goes viral

सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आपल्याचा पदाचा राजीनामा दिला आहे. वादग्रस्त ऑडिओ व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांनी तात्काळ मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यानंतर सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा तात्पुरता पदभार हा सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले.

श्रीकांत देशमुख यांनी दीज वर्षांपूर्वी जिल्हाध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतली होती, मात्र त्यांचा एका तरुणीसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने देशमुख यांनी तात्काळ राजीनामा दिला आहे. या व्हायरल व्हिडीओवर श्रीकांत देशमुख यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या व्हिडीओमध्ये एका महिलेने त्यांच्यावर फसवणूकीचे आरोप केले आहेत. या व्हिडीओत श्रीकांत देशमुख दिसत आहेत.

श्रीकांत देशमुख हे सोलापूर भाजपचे जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी काँग्रेस आणि जनसुराज्य पक्षासाठी काम केले आहे. गेली 3 – 4 वेळा सांगोला मतदार संघातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली, मात्र यात त्यांना यश आले नाही, दरम्यान 2009 सालच्या निवडणुकी प्रचारात गोळीबार झाल्याचा आरोप श्रीकांत देशमुख यांनी केला होता. मात्र हा गोळीबार बनावट असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे देशमुख यांनी दीड वर्षांपूर्वी भाजप जिल्हाध्यक्ष पदाची सूत्र हाती घेतली.


हेही वाचाः न्यायालयाच्या निर्णयावर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय, संजय राऊतांचा आरोप