घरताज्या घडामोडीसोलापूर मनपा आयुक्तांना कोरोनाची लागण!

सोलापूर मनपा आयुक्तांना कोरोनाची लागण!

Subscribe

सोलापूर मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. काल सोलापूर मनपा आयुक्तांची अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सध्या सोलापूर महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी सोलापूरचे नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.

शनिवारी जिल्ह्याधिकारी कार्यालयात गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थित आढावा बैठकीला सोलापूर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनासह राज्याच्या मंत्रीमंडळापर्यंत सोलापुरातील कोरोनाची पोहोचली आहे. यामुळे सध्या सोलापूर मनपाचे आयुक्त कोणा कोणाच्या संपर्कात आले आहेत. याचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा – केंद्राकडून राज्याला दीड हजार कोटींचा पहिला हप्ता; ग्रामविकास मंत्र्यांची माहिती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -