घरमहाराष्ट्रयंत्रमाग कामगारांचे 'भीक मांगो' आंदोलन

यंत्रमाग कामगारांचे ‘भीक मांगो’ आंदोलन

Subscribe

सोलापूर : शहर आणि जिल्ह्यातील यंत्रमाग व बॅक प्रोसेस कामगारांना गेल्या अनेक वर्षांपासून किमान वेतन मिळालेले नाही. यासाठी अनेक आंदोलने करूनही कारखानदारांनी मागण्यांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे याकडे शासनाचेच लक्ष वेधण्यासाठी सोलापूर जिल्हा यंत्रमाग कामगार संघटना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीख मांगो आंदोलन करण्यात आले.

कामगारांशी केला होता करार

- Advertisement -

अध्यक्ष भीमाशंकर कोकरे, सचिव सोमशेखर पासकंटी, नागेश केदारी आणि कार्याध्यक्ष श्रीधर गुडेली यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यंत्रमाग कामगारांना शेकडा १० पैसे तर बॅक प्रोसेस कामगारांना दरमहा कमीत कमी ५०० रुपये वेतनवाढ देण्यात असा करार ३१ जुलै २०१७ रोजी करण्यात आला होता. तो करार संपुष्टात आल्याने कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे. सध्याच्या तुटपुंज्या पगारावर कामगारांना जगणे अवघड बनले आहे. मुलांच्या शिक्षणाचेही अबाळ होत आहे. यंत्रमाग कामगारांना ज्या सवलती देण्यात येतात त्या सवलतीसुद्धा बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने कामगार हवालदिल झाल्याचे भीमाशंकर कोकरे यांनी सांगितले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -