घरमहाराष्ट्रपत्नीला कोरोना झाल्याच्या भीतीने पतीने गळफास लावून केली आत्महत्या!

पत्नीला कोरोना झाल्याच्या भीतीने पतीने गळफास लावून केली आत्महत्या!

Subscribe

ही घटना सोलापुरातील न्यू बुधवार पेठ येथे घडली असून त्या व्यक्तीने आपल्या राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

देशभरात कोरोनाने थैमान घातल्याने सर्वांच्याच मनात कोरोनाची धास्ती निर्माण झाली आहे. असाच एक प्रकार सोलापूरमधून समोर आला आहे. पत्नीला कोरोना झाल्याच्या भीतीमुळे पतीने चक्क आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोलापुरातील न्यू बुधवार पेठ येथे घडली असून तेथे अभिमन्यू कसबे नावाच्या व्यक्तीने आपल्या राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

असा घडला प्रकार

महापालिकेच्या सफाई कर्मचारी असलेल्या शारदाबाई कसबे यांना ताप आल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ताप येणं हे कोरोनाचं लक्षण असल्याने त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांचे पती अभिमन्यू कसबे हे अस्वस्थ झाले. यावेळी त्यांनी पत्नीला हॉस्पिटलमध्ये भेटायला जाण्याची इच्छा व्यक्त केली, मात्र त्यांना परवानगी देण्यात आली नाही, अशी माहिती न्यूज १८ लोकमतने दिली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती जोडभावी पेठ पोलीस स्टेशनला देण्यात आली असून ते तपास करत आहेत. गळफास घेतल्यानंतर अभिमन्यू कसबे यांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. धक्कादायक म्हणजे ज्या रुग्णालयात पत्नीला उपचारासाठी दाखल केले होते त्याच रुग्णालयात आपल्या पतीचा मृतदेह आणला असल्याची जराही कल्पना पत्नी शारदाबाई यांना नव्हती.


Corona Update: राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख पार!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -