घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदिवाळीच्या दिवशी सूर्यग्रहण, 'इतक्या' वर्षांनी आला अद्भूत योग

दिवाळीच्या दिवशी सूर्यग्रहण, ‘इतक्या’ वर्षांनी आला अद्भूत योग

Subscribe

नाशिक : हिंदू परंपरेनुसार, अश्विन आमावस्येच्या दिवशी सर्वत्र दिवाळी सण साजरा केला जातो. यंदा दिवाळीच्या दिवशीच सूर्यग्रहण आहे. अश्विन आमावस्या तिथी 24 ऑक्टोबर, संध्याकाळी 5 वाजून 27 मिनिटांपासून ते 25 ऑक्टोबर संध्याकाळी 4 वाजून 18 मिनिटांपर्यंत असेल. अशात सूर्यग्रहण 12 तास आधी म्हणजे 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे.

24 ऑक्टोबर रोजी दिवाळी असेल आणि वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 25 तारखेला होईल. हे आंशिक ग्रहण असून, देशात अनेक ठिकाणी दिसेल. त्यामुळे धार्मिक दृष्टिकोनातूनही ते विशेष असेल. यापूर्वी 30 एप्रिलला सूर्यग्रहण झाले होते. मात्र, ते देशात दिसले नव्हते. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, भारतातून दिसणारे पुढील मोठे सूर्यग्रहण 21 मे 2031 रोजी होणार आहे जे कंकणाकृती ग्रहण असेल. त्याच्या तीन वर्षांनंतर 20 मार्च 2034 रोजी संपूर्ण सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे.
सूर्याचा अर्धा भाग झाकलेला असेल

- Advertisement -

आमावस्येला सूर्य, चंद्र व पृथ्वी जवळजवळ एका रेषेत येतात, त्याला सूर्यग्रहण म्हणतात. 25 ऑक्टोबरलाही सूर्य, चंद्र आणि पृथ्वी जवळजवळ सरळ रेषेत असतील. यामुळे काही काळ चंद्र सूर्याला अंशतः झाकून ठेवताना दिसेल, ज्यामुळे आंशिक सूर्यग्रहण होईल.

या राशींना ठरेल लाभदायी

सूर्यग्रहण फारसे चांगले मानले जात नसले तरी सूर्यग्रहणावेळी तूळ राशीत चार ग्रहांचा संयोग होणार असून सूर्याबरोबर केतू, शुक्र व चंद्रही तूळ राशीत असतील. कर्क, सिंह, धनु, मीन या चार राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण शुभ ठरू शकते, असे सांगितले जाते.

दिवाळीच्या कालावधीत सूर्यग्रहणाचा योग हा २७ वर्षांनंतर आला आहे. यापूर्वी १९९५ मध्ये असे सूर्यग्रहण झाले होते. या ग्रहणाकडे नागरिकांनी एक खगोलीय घटना म्हणून पाहिले पाहिजे. २५ ऑक्टोबरला होणार्‍या सूर्यग्रहणाचा कालावधी १ तास १७ मिनिटांचा असून, या ग्रहणाला ४ वाजून ४७ मिनिटांनी सुरू होईल. वातावरण चांगले असल्यास काही प्रमाणात योग्य साधनांचा वापर करुन सूर्यग्रहणाचा आनंद घेता येईल. : अपूर्वा जाखडी, स्पेस एज्युकेटर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -