घरमहाराष्ट्रजवान सुट्टीवर आला; गजाआड झाला

जवान सुट्टीवर आला; गजाआड झाला

Subscribe

सरकारी अधिकाऱ्याला केली जबर मारहाण
नातलगांच्या जमिनीची मोजणी करत नाही, म्हणून संतापलेले भारतीय सैन्य दलातील जवान गणेश झेंडे यांनी श्रीगोंदा शहरातील भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधिक्षकाला मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी जवान झेंडे यांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. झेंडे हे १५ दिवसांच्या सुट्टीवर आले होते. श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील सुभद्राबाई अर्जुन कळमकर विरुद्ध अर्जुन पार्वती कळमकर असा कळमकर कुटुंबियांच्या गट नं. २२४ मधील क्षेत्राच्या मोजणीचा वाद सुरु आहे. या प्रकरणात वादी-प्रतिवादी न्यायालयात गेल्याने मोजणीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मोजणी करण्यासाठी न्यायालयाचा मनाई हुकूमही आहे. त्यामुळे या गटाची मोजणी करता येत नाही.

या कुटुंबियांचे नातेवाईक असलेले जवान गणेश झेंडे हे १५ दिवसांसाठी सुट्टीवर घरी आले. त्यांना हा प्रकार समजला. त्यावर संतापून जवान झेंडे हे थेट भूमीअभिलेख कार्यालयातील उपाधिक्षक भांदुर्गे यांच्या दालनाकडे केले. त्यावेळी त्यांच्या हातात खोऱ्याचा दांडा होता. दालनात प्रवेश करताच जवान झेंडे यांनी कळमकर यांच्याकडून पैसे खाऊनही त्यांचे काम करत नाहीस, काम अडवून ठेवतोस, असे म्हणत उपाधीक्षक भादुर्गे त्याच्यावर खोऱ्याच्या दांड्याने प्रहार केला.

- Advertisement -

जवान झेंडे यांनी दरवाजा उघडल्यावर मोठा आवाज झाला होता. म्हणून आधीच उपाधीक्षक भांदुर्गे हे सावध झाले होते. त्यांनी अचानक जवान झेंडे यांच्याकडून झालेला प्रहार हातावर घेतला, त्यावेळी त्यांच्या हाताला जबर दुखापत झाली. त्याच वेळी समोर बसलेल्या अन्य कर्मचाèयांनी जवान झेंडे यांच्या हातातील खोऱ्याचा दांडा हिसकावून घेतला. त्यानंतरही जवान झेंडे यांनी उपाधीक्षक भांदुर्गे यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती होताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि जवान झेंडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर उपाधीक्षक भांदुर्गे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

पोलिसांनी जवान झेंडे यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे (353), सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण करणे (332), शिवीगाळ दमदाटी करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले आहेत. सध्या ते अटकेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -