Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र धर्मांध राजकारणापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवा; छगन भुजबळ यांचा भाजपाला टोला

धर्मांध राजकारणापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवा; छगन भुजबळ यांचा भाजपाला टोला

Subscribe

नाशिक : कर्नाटकमध्ये हिजाब, बजरंगबली, अमुक तमूक सगळा वापर झाल्यानंतरसुध्दा भाजपचा पराभव झाला. पण, इतका प्रचंड पराभव होईल असे वाटले नव्हते. यापुढे राजकारणात धर्मांध राजकारण फार काळ टिकणारे नाही. शेवटी तुम्ही एक वेळा लोकांना फसवू शकता, सतत फसवू शकत नाही. लोक आता हुशार झाली आहेत असा टोला लगावत राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी भाजपच्या कार्यपध्दतीवर ताशेरे ओढले.

सोमवारी (दि.22) नाशिक येथे माध्यमांशी त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. त्र्यंबक येथील धूप प्रकरण तसेच राज्याच्या विविध भागात घडलेल्या दंगलीच्या घटनांबाबत बोलतांना भुजबळ म्हणाले, राज्याच्या विविध भागात दंगली घडत आहे याचाच अर्थ निवडणूका जवळ आल्या आहेत असे मला वाटते. जिथे जिथे निवडणुका होणार आहेत तिथे हिंदू मते आकर्षित करण्यासाठी हिंदू-मुस्लिम दंगल घडवण्याचे काम काही लोक करत असतात. यातून हिंदू मतांचे धृवीकरण होते अन हिंदूंचे मसिहा आम्हीच आहोत हे दाखवून मत मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतू कर्नाटकमध्ये हिजाब, बजरंगबली, अमुक तमूक सगळा वापर झाल्यानंतरसुध्दा भाजपचा पराभव झाला. त्र्यंबकच्या बाबतीत मी माहिती घेतली.

- Advertisement -

त्र्यंबकेश्वरमध्ये सगळ्यांनी सांगितले आहे. गावकर्‍यांचेही काही म्हणणे नाही. पुजार्‍यांनी मला पाठवलेले मेसेज आहेत ते म्हणतात शेकडो वर्षांची प्रथा आहे. त्र्यंबकराजामुळे पोटपाणी चालते. पर्यटनामुळे आर्थिक चालना मिळते. म्हणून पायरीवर धूप दाखवून श्रध्दा अर्पण केली जाते. मग कशासाठी हे चालले आहे. मागे पार्वती खान यांनी मंदिरात जाऊन गायन केले होते. त्यामुळे तुम्ही काम करा महागाई कमी करा, रोजगार द्या शेतकरी, कष्टकर्‍यांचे प्रश्न सोडवा असा सल्ला देत धर्मांध राजकारण यापुढे फार काळ चालेल असे वाटत नाही असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

काय म्हणाले भुजबळ

  • महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत कोणतीही चर्चा नाही.
  • निवड समिती जागांबाबत चर्चा करेल.
  • निवडून येण्याची क्षमता तपासूनच निर्णय घेतला जाईल.
  • देशातील हुकुमशाही विरोधात सर्वांनी उभे राहणे आवश्यक.
  • जयंत पाटील यांच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही.
  • नोटबंदी हा तर सरकारचा खेळ कर्नाटक निवडणुक निकालापासून लक्ष हटविण्याचा हा प्रयत्न त्यांनीच ही नोट सुरू केली अन तेच बंद करताहेत.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -