अनिल परबांकडूनच साई रिसॉर्टची जागा खरेदी केली, सोमय्यांनी उघड केले सदानंद कदमांचे पत्र

किरीट सोमय्या यांनी सदानंद कदम यांचे एक पत्र शेअर केलं आहे. यामध्ये साई रिसॉर्ट हा अनिल परब यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले आहे.

Somaiya reveals Sadanand Kadam's letter Purchase of Sai Resort from Anil Parab
Somaiya reveals Sadanand Kadam's letter Purchase of Sai Resort from Anil Parab

भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सदानंद कदम यांचे पत्र उघड केलं आहे. दापोलीतील साई रिसॉर्टची जागा शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचीच होती हे पुन्हा एकदा उघड झाले आहे. अनिल परब यांनी अनधिकृतपणे रिसॉर्ट बांधला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच या रिसॉर्टचे बांधकाम करताना सीआरझेडच्या नियमांचेही उल्लंघन करण्यात आले आहे. परंतु हा रिसॉर्ट आपल्या मालकीचा नसल्याचे अनिल परब यांनी म्हटलं आहे. रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्यावर ईडीने छापेमारी केली होती.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर साई रिसॉर्टवरुन आरोप केला आहे. साई रिसॉर्ट हा अनिल परब यांचा असून त्यांनी कोरोना काळात मंत्री पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. साई रिसॉर्टचे मालक अनिल परब असून त्यांनी मालमत्ता सदानंद कदम यांना विकली असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. यानंतर सदानंद कदमांचे पत्र उघड करुन पुरावासुद्धा दिला आहे.

किरीट सोमय्या यांनी सदानंद कदम यांचे एक पत्र शेअर केलं आहे. यामध्ये साई रिसॉर्ट हा अनिल परब यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात आले आहे. जागा अनिल परब यांच्या मालकिची होती तसेच त्यांच्याकडून ही जागा आपण खरेदी केली असं सदानंद कदम यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलं आहे.

मंत्री अनिल परब यांच्यावर मनी लाँड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु साई रिसॉर्ट आपल्या मालकीचा नसल्याचे अनिल परब यांनी म्हटलं आहे. परंतु अनिल परब यांनी या जागेचा मालमत्ता कर भरला आहे. तसेच रिसॉर्ट बांधकामाचा खर्च १ कोटी दाखवला असल्याचे आरोप किरीट सोमय्या यांनी केले आहेत. दरम्यान याच प्रकरणात ईडीने काही दिवसांपूर्वी ७ ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. य़ामध्ये अनिल परब यांच्या दोन निवासस्थानी छापेमारी करण्यात आली होती.


हेही वाचा : कोणालाही न घाबरता अन् जुमानता कट्टर शिवसैनिकाला जिंकवायचं, मुख्यमंत्र्यांचे सेना आमदारांना आदेश