घरताज्या घडामोडीकिरीट सोमय्या उद्या भुजबळांच्या दारी; बेहिशेबी मालमत्तेची करणार पाहणी

किरीट सोमय्या उद्या भुजबळांच्या दारी; बेहिशेबी मालमत्तेची करणार पाहणी

Subscribe

आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चरची करणार पाहणी, पत्रकारांशीही साधणार संवाद

भाजप नेते किरीट सोमय्या बुधवार (दि.१) नाशिकमध्ये येत असून ते राष्ट्रवादीचे नेते तथा जिल्हयाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या बेहिशेबी मालमत्तेची पाहणी करणार आहेत. याबाबत सोमय्या यांनी स्वतःट्विट करत ही माहिती दिली. सोमय्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चरची पाहणी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीशी संबंधित ११ जणांवर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यापासून ते मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यापर्यंत, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यापासून ते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यापर्यंत ११ जणांची नावे आहेत. या ११ जणांमध्ये राष्ट्रवादीशी संबंधित तिघांचा समावेश आहे. त्यात जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ आणि अनिल देशमुख यांचा समावेश आहे. ठाकरे सरकारचे मंत्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची १०० कोटी रूपयांची बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या ट्विट करत म्हणाले, ‘ठाकरे सरकारचे मंत्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या १०० कोटींची बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केली.’ आयकर विभागाने भुजबळांवर कारवाई केली असेदेखील सोमय्या यांनी म्हटले आहे. मात्र, या इमारतीचे मालक अर्शद सिद्दीकी यांनी या मालमत्तेच्या व्यवहारात भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबाचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर सोमय्या यांनी पुन्हा भुजबळांवर निशाणा साधला असून त्यांनी आता मालमत्तेची पाहणी करण्याचे निश्चित केले आहे. सोमय्या यांनी स्वतः ट्विटरवर ही माहीती दिली. या पाहणीनंतर भाजप कार्यालयात ते पत्रकारांशी संवाद साधणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -