घरताज्या घडामोडीOBC आरक्षण संपवण्याचा काहींनी घाट घातलाय - विजय वडेट्टीवार

OBC आरक्षण संपवण्याचा काहींनी घाट घातलाय – विजय वडेट्टीवार

Subscribe

महाराष्ट्रात ओबीसी, वीजे, एनटी जनमोर्चा, जनजागृती अभियान राबवायला सुरूवात केली आहे. ओबीसीच्या संघटना यामध्ये सहभागी होत आहेत. पुढील दोन महिन्यात ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न करणे हा मोहिमेचा भाग असेल. ओबीसींसाठी घरकुल योजना सुरू करावी, महामंडळाना अधिकार द्यावेत, जातीनिहाय जनगणना व्हावी हा अभियानाचा उद्देश आहे. ओबीसीच्या हक्काचे कोणीही हिरावू शकत नाही, त्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून येत्या २२ जुलैपासून ओबीसी जनमोर्चा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दौरा आयोजित करण्यात आल्याची माहिती राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री तसेच ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ओबीसी आरक्षण संपवण्याचा काहींनी घाट घातला आहे. पण ज्यांच्या डोक्यात हे पाप आहे, ते धुतले जाईल असेही वडेट्टीवार म्हणाले.

येत्या २९ जुलैला ओबीसी मोर्चा आयोजित केला आहे. जालन्यापासून या मोर्चाची सुरूवात होईल. ओबीसी समाज एकाच झेंड्याखाली यावा हा उद्देश आहे. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणाचा उपयोग व्हावा हा हेतू आहे. ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न संपलेला नाही. हे आरक्षण टिकायला हवे म्हणूनच समाजाकडून हा पुढाकार घेण्यात आला आहे. आरक्षण संपवण्याचा घाट काही लोकांनी घातला आहे. मंडल आयोगाला विरोध करणारी अशी त्यांची विचार सरणीही त्याच स्वरूपाची आहे. पण ओबीसी आरक्षण हे आमच्या हक्काचे आहे. या आरक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या व्यथा सोडवण्याचा प्रयत्न आहे. समाजात अजुनही न्याय मिळाला नसल्याची भावना आहे. पण समाज म्हणून आम्ही जागरूक राहणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्यांच्या डोक्यात पाप आहे ते धुतले जाईल असेही वडेट्टीवार म्हटले.

- Advertisement -

मंत्री आहे, पण मागून सगळेच मिळत नाही

मी मंत्री आहे, पण मागून सगळेच मिळत नाही, कारण तिन्ही पक्षाचे सरकार आहे. जेव्हा एका पक्षाचे सरकार असते, तेव्हा प्रश्न सोडवता येतात. सध्याच्या घडीला समाजासाठी निधी मिळवून देण्याचा प्रश्न हा दुय्यम आहे. पण नुसत्या महाराष्ट्राच्या पातळीवर या प्रश्नाकडे न पाहता केंद्राकडूनही या प्रश्नावर मदत मिळणे गरजेचे आहे. कोरोनामध्ये सध्या निधीची कमतरता आहे ही गोष्ट जरी असली तरीही, हक्काचे आरक्षण टिकवण महत्वाचे असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले. म्हणूनच या जनजागृती अभियानाच्या माध्यमातून सर्व पक्षातील नेत्यांना एकत्र घेणार आहे. जिल्हावार आंदोलनासाठी आम्ही सर्वपक्षीय नेत्यांची मदत घेणार असल्याचेही ते म्हणाले. ओबीसी समाजाने एकत्र येऊन प्रश्न मांडले तर सुटू शकतात. ओबीसीच्या विविध संघटनांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम सुरू करण्याचा प्रयत्न आहे. सर्व पक्षाच्या लोकांना घेऊन दौरा आयोजित केला आहे. या दौऱ्यात ओबीसीचे नेते असतील, त्या नेत्यांना बोलावून चर्चा करून हे प्रश्न कुठल्या प्लॅटफॉर्मवर मांडायचे या बाबीवर चर्चा करतील. लोकांमध्ये मॅसेजही पोहचेल, लोकांमध्ये संघटीत व्हा हा संदेशही जाईल.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -