घरताज्या घडामोडीबारसूत कायदा-सुव्यवस्था बिघडविण्यासाठी काही लोक प्रयत्नशील; फडणवीसांचा आरोप

बारसूत कायदा-सुव्यवस्था बिघडविण्यासाठी काही लोक प्रयत्नशील; फडणवीसांचा आरोप

Subscribe

बारसू रिफायनरीचा वाद आता आणखीनच चिघळत चालला आहे. रिफायनरीला होणाऱ्या विरोधावरून सत्ताधारी विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत. अशातच बारसू प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

बारसू रिफायनरीचा वाद आता आणखीनच चिघळत चालला आहे. रिफायनरीला होणाऱ्या विरोधावरून सत्ताधारी विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत. अशातच बारसू प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. ‘त्या ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला पाहिजे, यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत. त्याठिकाणी सरकारला बदनाम करता येईल, अशी घटना घडावी असा यांचा प्रयत्न आहे’, असे सांगत फडणवीसांनी हल्लाबोल केला. (Some people are trying to disrupt law and order in Barsu dcm devendra Fadnavis allegations)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या गडचिरोली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी अनेक भागांची पाहणी केला. त्यानंतर आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय बैठक घेतली. या बैठकीनंतर फडणवीसांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

- Advertisement -

“मुळातच स्थानिकांचे समर्थन नाही. बाहेरून लोक नेऊन आंदोलन केले जात आहेत. स्थानिक अतिशय थोडे आहेत. पण तिकडे रिफायनरीला समर्थन देणारे लोक आहेत. मात्र, त्या ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला पाहिजे, यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत. त्याठिकाणी सरकारला बदनाम करता येईल, अशी घटना घडावी असा यांचा प्रयत्न आहे. याशिवाय आपली राजकीय गोळी ठेवून मारण्याचा प्रयत्न केले जात आहेत”, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“जनतेला समजेलेल आहे की हे दुटप्पी आहेत. एकीकडे रिफायनरी करण्यासाठी हे पत्र पाठवतात आणि दुसरीकडे रिफायनरीला विरोध करत आंदोलनाला जातात. त्यामुळे त्यांचा दुहेरी चेहरा समोर आलेला आहे. या आंदोलनाता काही लोक, नेते बाहेरून आलेले आहेत. काही नेते वारंवार आदोलनामध्ये असतात”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

प्रत्येक जिल्ह्यात खरीप आढाव्याची बैठक

“खरीपाच्या संदर्भात संपूर्ण नियोजन करत असतो. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये खरीप आढाव्याची बैठक घेतली जाते. खरीपाच्या निमित्ताने काय तयारी आहे? बियाणं, खतं उपलब्ध आहेत की नाही? अशा विविध प्रकारच्या सोयी कराव्या लागतात, मात्र त्या झाल्या का नाही, याची तपासणी करण्यासाठी यंत्रणा सक्रीय आहे की नाही? याचा आढावा घेतला जातो. त्यानंतर सर्व जिल्ह्यांच्या बैठका झाल्यानंतर मुख्यमंत्री अंतिम बैठक एकत्रित जिल्ह्यांची घेत असतात. त्यामुळे खरिपाचा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वी सर्व जिल्ह्यांच्या बैठका करणे गरजेचे असून, आपल्याला राज्याची बैठक घेता येईल. या पार्श्वभूमीवर पहिली बैठक ही गडचिरोली जिल्ह्याची होत आहे. यामध्ये एकूण खरीपाच्या संदर्भात आढावा घेण्यात येईल”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


हेही वाचा – ‘मविआची सभा म्हणजे निराश लोकांचे अरण्यरुदन’, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -