घरमहाराष्ट्रकाहींना वाटतं शिवसेना उघड्यावर पडलेली वस्तू, उद्धव ठाकरेंचा नाव न घेता शिंदेंवर...

काहींना वाटतं शिवसेना उघड्यावर पडलेली वस्तू, उद्धव ठाकरेंचा नाव न घेता शिंदेंवर निशाणा

Subscribe

तसं पाहिलं तर मार्मिक काय, शिवसेना काय आमची सगळी मंडळी चिरतरुण आहेत, त्यामुळे तरुणांचा ओढा मार्मिककडे कायम राहिलेला आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत

मुंबईः काही जणांना वाटतं शिवसेना उघड्यावर पडलेली वस्तू आहे की ती कोणीही उचलून घेऊन जाऊ शकते. तसं नाही आहे, शिवसेनेची पाळंमुळे 62 वर्ष सरळ सरळ दिसतंय. त्याच्या आधीपासून म्हणजेच माझ्या आजोबांनीसुद्धा विचारांची पेरणी केली, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केलाय. मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिकाच्या 62 व्या वर्धापन दिनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

माझ्या डोळ्यांसमोर मार्मिकच्या स्थापनेपासूनचा इतिहास आहे. माझं वय 62 आहे आणि मार्मिक 62 व्या वर्षीही चिरतरुण आहे. माझे आजोबा आणि बाळासाहेब सांगायचे वयाने किती मोठा माणूस झाला, वयाने माणूस थकतो, शरीराने थकतो, पण विचाराने थकता कामा नये. ज्या दिवशी विचार थकतील त्या दिवशी माणूस वयस्कर झाला. तसं पाहिलं तर मार्मिक काय, शिवसेना काय आमची सगळी मंडळी चिरतरुण आहेत, त्यामुळे तरुणांचा ओढा मार्मिककडे कायम राहिलेला आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.

- Advertisement -

व्यंगचित्रकार काय असतो, व्यंगचित्रकार काय करू शकतो, त्याचं जगातलं उत्तम उदाहरण म्हणजे शिवसेना आहे. शिवसेना नसती तर महाराष्ट्रात मराठी माणसाचं आणि देशात हिंदूंचं काय झालं असतं हा विचार आज प्रत्येकाने केला पाहिजे. शिवसेना एका सकाळी पडलेलं स्वप्न म्हणून निर्माण झालेली नाही. शिवसेनेची बिजे ही मार्मिकमध्ये आहेत. मार्मिकने बिजे पेरली आणि मराठी माणसाच्या अन्यायाला वाचा फोडली आणि मग मार्मिकने शिवसेनेला जन्म दिला. शिवसेनेसाठी सामनाने जन्म दिला, असंही उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केले.

काही जणांना वाटतं शिवसेना उघड्यावर पडलेली वस्तू आहे की ती कोणीही उचलून घेऊन जाऊ शकते. तसं नाही आहे, शिवसेनेची पाळंमुळे 62 वर्ष सरळ सरळ दिसतंय. त्याच्या आधीपासून म्हणजेच माझ्या आजोबांनीसुद्धा विचारांची पेरणी केली. मार्मिकची सुरुवात झाली तेव्हा देशाचं स्वातंत्र्य 13 वर्षांचं होतं. मराठी माणसानं मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली होती. मुंबई मिळवलेली होती, मुंबई घेतली होती, रक्त सांडून मुंबई मिळवील, मराठी माणसाच्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम मार्मिकने केल्याचा उल्लेखही त्यांनी केलाय.

- Advertisement -

हेही वाचाः प्रतिशिवसेना भवनावरून उदय सामंतांचा खुलासा, म्हणाले जनतेला भेटता येण्यासाठी…

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -