घरताज्या घडामोडीमाथेफिरूंची प्रेमी युगुलाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल...

माथेफिरूंची प्रेमी युगुलाला मारहाण, व्हिडिओ व्हायरल…

Subscribe

सोशल मिडीयावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ महाराष्ट्राला सुन्न करणारा आहे. एका टोळीने या जोडप्याला ताब्यात घेऊन मारहान केल्याचे दिसते आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्राला सुन्न करणारी एक घटना जालनात घडली आहे. प्रेमी युगुलाला मारहाण करून मुलीचा विनयभंग केल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असून ही घटना जालनात घडल्याची धकादायक बाब समोर येत आहे. या व्हिडिओत एकमेकांना भेटायला आलेल्या जोडप्याला काही जणांकडून मारहान होताना दिसत आहे. हा व्हिडीओ जालनात व्हायरल झाला असून यात एका टोळीने या जोडप्याला मारहाण केली आहे. एका वृत्त वाहिनीने हा व्हिडिओ प्रसारित केल्यावर पोलिसांनी यांची दखल घेतली आहे.

सोशल मिडीयावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ महाराष्ट्राला सुन्न करणारा आहे. एका टोळीने या जोडप्याला ताब्यात घेऊन मारहान केल्याचे दिसते आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. हे आरोपी तेथील स्थानिक असून, या प्रकरणाचा व्हिडीओ करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता या आरोपी कडूनच इतर आरोपींची माहीती घेण्यात येणार आहे. ताब्यात घेण्यात आलेला आरोपी हा तेथील स्थानिक रहिवासी असून त्याचे नाव ‘कृष्णा वाघ’ असल्याचे समजते आहे. तसेच चारही आरोपींची ओळख पटली असून याविषयी अधिक तपास पोलिस करीत आहेत.

- Advertisement -

मात्र ही घटना दोन-तीन दिवसांपूर्वीची असून याची माहिती पोलिसांना का नव्हती? हा सवाल उपस्थित करण्यात येतोय. हा व्हीडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यावर या घटनेची दखल घेत पोलिसांनी या घटनेचा तपास करण्याकरीता पथक नेमले आहे.

जालना धक्कादायक घटना; प्रेमी युगुलाला बेदम मारहाण करून तरुणीचा विनयभंग

जालना धक्कादायक घटना; प्रेमी युगुलाला बेदम मारहाण करून तरुणीचा विनयभंग

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಜನವರಿ 31, 2020

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -