घरमहाराष्ट्रकधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

कधीकाळी कमळासोबत वाघ होता; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

Subscribe

जगातील आघाडीचे कार्डियाक सर्जन आणि एशियन हार्ट इन्स्टिट्यूट, मुंबईचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पांडा यांनी टिपलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरले आहे.

मुंबई : जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वन्यजीव छायाचित्र प्रदर्शनाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन मंगळवारी (21 नोव्हेंबर) रोजी पार पडले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रदर्शनातील वाघांचे फोटो पाहून कधीकाळी कमळासोबतही वाघ होता असे म्हणत भाजपला मिश्कील टोला लगावला. (Sometimes there was a tiger with the lotus Uddhav Thackerays attack on BJP)

जगातील आघाडीचे कार्डियाक सर्जन आणि एशियन हार्ट इन्स्टिट्यूट, मुंबईचे अध्यक्ष डॉ. रमाकांत पांडा यांनी टिपलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरले आहे. एशियन वाईल्डलाइफ ट्रस्टच्या वतीने हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. याचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

- Advertisement -

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला एक तरी माणूस सापडला की त्यांना मी प्रेरणा दिल्या. पण काही लोक असे आहेत. तुम्हाला ते माहिती आहे असे म्हणत त्यांनी सभागृहात हशा पिकवला. पुढे बोलताना ते म्हणाले की, फोटोग्राफी हा असा विषय आहे की त्याच्यावर बोलण्यापेक्षा ती करण्यात आनंद आहे. मी येथे आल्यानंतर मला अनेकांनी विचारलं की, तुम्ही वाइल्ड लाइफ फोटोग्राफी करता की नाही? तेव्हा मी त्यांना सांगितले की, वाइल्ड लाइफ फोटोग्राफी हीच तर खरी दुनिया आहे. परंतू आता जी शहरातील वाइल्ड लाइफ दुनिया आहे ती शहरात आहे पण फोटोग्राफीच्या लायकीची राहली नाही. म्हणजे राजकारणातील जी वाइल्ड लाइफ आहे त्याची लायकीची राहली नाही असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आताच्या घसरत चाललेल्या राजकीय पातळीवर बोट ठेवले.

- Advertisement -

हेही वाचा : चिंता नको, बेस्टकडे 3 हजार 337 बसगाड्या राहणारच! BMC आयुक्तांचे आश्वासन

विकासामुळे वन्यजीवांचा ऱ्हास होतोय

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ते तेथे त्या कोपऱ्यात लिलींसोबत दोन वाघ आहेत. ते पाहून माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. कारण एक काळ असा होता की, कमळासोबतही वाघ होता. 25 ते 30 वर्ष कमळासोबत वाघ होता आता तो नाही असे म्हणत भाजपला टोला लगावला. फोटोग्राफी करणं ही एक कला आहे. आपल्यातील आवड जोपासून काम केलं तर या शहरातील ज्या व्याधी आपल्या मागे लागतात त्या लागणारच नाहीत. प्रत्येक माणसामध्ये एखादं वेगळं व्यक्तीमत्व असते. आपल्या शहरातही वाइल्ड लाइफ आहे. मुंबईतील पक्षी, कर्नाळ्याचे पक्षी हे आहेत पण ते आपल्यापासून जपून राहतात. आपण जो काही हा विकास चालवला आहे त्यातून या जीवांचा ऱ्हास आहे असे म्हणत त्यांनी चिंता व्यक्त केली.

या उद्घाटनपर कार्यक्रमाला रश्मी ठाकरे, माजी आमदार सुरेश शेट्टी, जहांगीर आर्ट गॅलरीच्या सचिव के जी मेनन, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, कॉर्पोरेट अफेअर्स ऑफ रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक परिमल नथवानी, जहांगीर आर्ट गॅलरीचे संचालक जहांगीर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -