कार जळीत प्रकरण : नागपुरच्या ‘त्या’ घटनेतील आई आणि मुलाचाही मृत्यू

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने लॉकडाऊन घोषित केले. लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागले. तसेच, काहींचे व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे आर्थिक संकट आल्याने जगायचे कसे हा प्रश्न सर्वसामन्यांना सतावत होता.

Nagpur car burn

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने लॉकडाऊन घोषित केले. लॉकडाऊनमुळे अनेकांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागले. तसेच, काहींचे व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे आर्थिक संकट आल्याने जगायचे कसे हा प्रश्न सर्वसामन्यांना सतावत होता. परिणामी, या आर्थिक संकटाच्या कारणामुळे काहींना आपले जीवन संपवल्याची घटना घडल्या. अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी नागपुरमध्ये घडली होती. (son and wife also died due to Corona Business stopped family burned car)

आर्थिक संकटामुळे एका व्यावसायिकाने कार जाळून घेतली. रामराव भट असे व्यावसायिकाचे नाव असून, त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. मात्र मुलगा आणि आई गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

कार पेटवल्याने व्यावसायिक रामराव भट यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला. मुलगा नंदन भट यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर मंगळवारी संगीता रामराव भट यांचाही मृत्यू झाला आहे. १९ जुलै रोजी व्यावसायिक रामराव भट यांनी स्वत:ची कार जाळली होती. आर्थिक अडचणीतून रामराव यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

नेमकी घटना काय?

रामराव भट हे वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये आपल्या कुटुंबासोबत जेवायला गेले होते. खापरी पुनर्वसन केंद्राजवळ पोहचले. त्यांनी आपली कार थांबविली. पत्नी आणि मुलाला अॅसिटीडीची औषध पिण्यासाठी दिली. पण, मुलाला संशय आला आणि त्याने ते औषध घेण्यास नकार दिला.

मुलाने औषध पिण्यास नकार दिल्याने तिघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर रामराव भट यांनी ज्वलनशील पदार्थ फवारून कार पेटवली. यामध्ये रामराव यांचा जागीच कारला लागलेल्या आगीत जळून मृत्यू झाला होता. मात्र पत्नी संगीता व मुलगा नंदन या दोघांनी पळ काढल्याने ते जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपस्थितांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा नंदनने जखमी असताना पोलिसांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली होती. यामध्ये त्याने सांगितले की, व्यवसाय करण्याची माझी इच्छा होती. पण, वडिल नोकरीसाठी आग्रह करत होते. मात्र, तो काही काम करत नव्हता. कुटुंबाला हातभार लागत नव्हता. त्यामुळे त्यांच्यापुढील संकट गंभीर होत होते. त्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. रामराव यांचे नट-बोल्ड उत्पादन करण्याचे काम होते. कंपन्यांना ते माल पुरवठा करण्याचे काम करत होते.


हेही वाचा – मोदी सरकारला जाब विचारल्याने सोनिया, राहुल गांधींची ईडीकडून चौकशी; नाना पटोलेंचा आरोप