Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन atrocity case: सोनाक्षी सिन्हाच्या वक्तव्याचा होणार फेरतपास; बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने आदेश

atrocity case: सोनाक्षी सिन्हाच्या वक्तव्याचा होणार फेरतपास; बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने आदेश

Subscribe

 

बारामतीः अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाविरोधात दाखल असलेल्या अ‍ॅट्रासिटी तक्रारीचा फेरतपास करण्याचे आदेश बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने आहेत, अशी माहिती अ‍ॅड. हेमचंद्र मोरे यांनी दिली.

- Advertisement -

सोनाक्षी सिन्हाने एका मुलाखतीत एका विशिष्ट जातीचा उल्लेख केला. त्यामुळे तिच्या विरोधात बारामती जिल्हा सत्र न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली. उद्धव लालबिने यांनी अ‍ॅड. हेमचंद्र मोरे यांच्या मार्फत ही तक्रार दाखल केली होती.  त्याची दखल घेत न्यायालयाने पोलिसांना याचा तपास करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी तपास करुन त्याचा अहवाल सादर केला. सोनाक्षी सिन्हाने मुलाखतीत एका विशिष्ट जातीचा उल्लेख केला. पण कोणता गुन्हा केला नाही, असा अहवाल पोलिसांनी दिला.

या अहवालवर अ‍ॅड. हेमचंद्र मोरे यांनी संशय व्यक्त केला. सोनाक्षी सिन्हाचा जबाब न घेताच पोलिसांनी हा अहवाल सादर केला असल्याचे अ‍ॅड. हेमचंद्र मोरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्याची दखल घेत न्यायालयाने या तक्रारीच्या फेरतपासाचे आदेश अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जे.पी.दरेकर यांनी दिले आहेत. अ‍ॅड. हेमचंद्र मोरे यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत ही माहिती दिली.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या वर्षी सोनाक्षी सिन्हा विरोधात मानहानीचा दावाही दाखल झाला होता. प्रमोद शर्मा यांनी हा दावा केला होता. या दाव्यात त्यांनी म्हटले होते की, मी कार्यक्रमांचे आयोजन करत असल्याने मी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींना कार्यक्रमात बोलवतो. त्याचप्रमाणे मी सोनाक्षी सिन्हालाही बोलावलं होतं. हा कार्यक्रम 30 डिसेंबरला 2018 ला दिल्लीमध्ये होणार होता. परंतु सोनाक्षी हिने शेवटच्या क्षणी या कार्यक्रमाला यायला नकार दिला आणि तिच्याबरोबरच्या सहकलाकारांनीही नकार दिला होता. पण या कार्यक्रमासाठी पूर्ण मानधन घेतलं असल्याचा आरोप शर्मा यांनी केला.

याप्रकरणी सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू झाल्यावर सोनाक्षी सिन्हाने मुंबईमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेत सांगितले की, या सर्व अफवा असून, तिने इव्हेंट मॅनेजरबद्दल बोलताना अपशब्दांचा वापर केला असल्याने तिच्या विरोधात मानहानीचा खटला करण्यात आला आहे.

- Advertisment -