घरताज्या घडामोडी'ताई आता बस कर; फक्त महाराज इंदुरीकर'; सोशल मीडियावर गाण्याचा धुमाकूळ

‘ताई आता बस कर; फक्त महाराज इंदुरीकर’; सोशल मीडियावर गाण्याचा धुमाकूळ

Subscribe

'ताई आता बस कर; फक्त महाराज इंदुरीकर' हे गाणे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’, असे विधान करणारे ‘प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याविरोधात वादळ उठलेले असताना आता इंदुरीकर यांच्या समर्थनाथ अकोले तालुका एकवटला आहे. दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई विरुद्ध प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज वाद आणखी वाढत असताना आता यू – ट्यूबवर त्यांना इशारा देणारा एका गाण्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. इंदुरीकरांचे समर्थक आणि तरुणाईमध्ये सध्या या गाण्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

- Advertisement -

काय आहे गाण्याचे बोल

‘ताई आता बस्स कर, फक्त महाराज इंदुरीकर’, असे हे गाण्याचे बोल आहेत. या गाण्यातून इंदुरीकरांच्या गाण्याचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच इंदुरीकर तरुण पिढीला ज्ञान देत आहेत. त्यांच्या कीर्तनामुळे तमाशाला जाणारा तरुण अध्यात्माकडे वळला आहे. तर इंदोरीकर लोकांपुढं सत्य मांडताहेत, जे तुम्हाला कधीच जमणार नाही, असा टोलाही गाण्यातून तृप्ती देसाई यांना लगावण्यात आला आहे. सर्व जनता त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे त्यांची नाहक बदनामी थांबवा. त्याचा काही उपयोग होणार नाही,’ असेही गाण्यातून फटकारण्यात आले आहे.

तृप्ती देसाईंनी ‘इंदुरीकरांना काळ फासण्याचे वक्तव्य केले होते’. त्या विरोधात आज अकोले बंदची हाक देण्यात आली आहे. विशेष म्हणजे टाळ, मृदुंगाच्या गजरात निषेध करण्यात येणार आहे. तसेच जागो जागी फ्लेक्स देखील लावण्यात आले आहेत. तर अनेक ठिकाणी गाड्यांवरही पोस्टर लावण्यात आले आहेत. दरम्यान, इंदोर ते अकोले मोटारसायकल रॅली काढण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महापालिकेचे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मेगा ऑपरेशन, 56 मार्बलची दुकाने जमीनदोस्त


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -