घरदेश-विदेशसोनिया गांधींनी बोलावली विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक; शरद पवार, उद्धव ठाकरेंशी करणार...

सोनिया गांधींनी बोलावली विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक; शरद पवार, उद्धव ठाकरेंशी करणार चर्चा

Subscribe

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षाच्या सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. येत्या २० ऑगस्टला ही बैठक होणार आहे. या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत संसदेत केंद्र सरकारच्या विरोधात विरोधी पक्षांची एकता आणखी बळकट करण्यावर चर्चा होईल.

सोनिया गांधी यांनी बंगाल आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना २० ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली. विरोधकांची एकता मजबूत आहे. 20 ऑगस्ट रोजी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांशी बोलणार आहेत. सर्व विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही त्यात सामील होणार आहेत, अशी माहिती राऊत यांनी दिली.

- Advertisement -

संजय राऊत दिली बैठकीची माहिती

“विरोधक एकजूट आहेत. २० ऑगस्टला काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या बैठकीला उपस्थित राहतील,” अशी माहिती राऊत यांनी दिली.

दरम्यान, विरोधी पक्षांनी आज सकाळी केंद्र सरकारच्या विरोधात संसद ते जंतर मंतर पर्यंत निषेध मोर्चा काढला. तत्पूर्वी, सर्व नेत्यांनी संसदेत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दालनात बैठक घेतली ज्यामध्ये आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह देखील उपस्थित होते.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -