घरउत्तर महाराष्ट्रउगाच पराचा कावळा करण्यात आला; 'खडाजंगी' प्रकरणावर भुजबळ स्पष्टच बोलले...

उगाच पराचा कावळा करण्यात आला; ‘खडाजंगी’ प्रकरणावर भुजबळ स्पष्टच बोलले…

Subscribe

नाशिक : शासन सेवेत असलेल्या ओबीसी अधिकारी, कर्मचारयांची आकडेवारी सादर करतांना सचिवांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चुकीची माहिती दिल्याने मी दादांना मोठया आवाजात बोललो . मात्र आमच्या दोघांमध्ये कोणताही वाद नाही. उगाच पराचा कावळा करू नका असे सांगत अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयातील बैठकीतील वादाबाबत स्पष्टीकरण दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात वादाची ठिणगी पडल्याची जोरदार चर्चा आहे. यावर शनिवारी नाशिकमध्ये भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले, मी बैठकीत दिलेली आकडेवारी गायकवाड आयोगाची होती. सरकारमध्ये नोकरीत घेतांना आरक्षणाचा अनुशेष बाकी आहे, याकडे मी लक्ष वेधले. नोकरीत अनुशेष दिसतोय, हे मी सांगत असतांना अजितदादांनी सेक्रेटरींना याबाबत विचारले सचिवांनी अशी काही माहिती नसल्याचे सांगितले. माझ्या बोलण्यानंतर अजितदादा म्हणाले, अशी काही माहिती नाही आणि ती सत्य नाही. त्यामुळे मी उत्स्फूर्तपणे बोललो, की तुमच्याकडे माहिती नाही, असे होऊ शकत नाही. त्याच्यावरून थोडीशी बोलचाल झाली. मात्र त्याचा पराचा कावळा करण्यात आला, उगाचच राई का पहाड केला गेला, असे छगन भुजबळ म्हणाले. आमच्यात मतभेद नाही. मी माझा मुद्दा थोड्या मोठ्या आवाजात मांडला एवढेच. तो मुद्दा तिथे संपलेला आहे. एका घरात दोन भावांच्या अशा चर्चा होत असतात. त्यात खिंडार, अंतर्गत लढाई असे काही नाही, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

राष्ट्रवादीत फुट नाहीच

निवडणूक चिन्ह आणि पक्ष यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एक-दोन आमदार आणि 44 आमदार यात फरक आहे. 80 टक्के असतील तर त्यात फरक आहे. घड्याळ चिन्हं गोठवल जाणार याची माहिती नाही. जयंत पाटील देखील म्हणाले, की आमचा पक्ष फुटलेला नाही. फक्त पक्षांतर्गत अध्यक्ष आणि इतर निवडणुका असतात. आमची खात्री आहे पक्षाचे चिन्हं आणि सर्व गोष्टी आमच्याकडे राहतील, असेही त्यांनी सांगितले.

वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही

अजितदादा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या गणपतीला गेलेच नाही. त्यावरून राजकीय वर्तुळातून तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजितदादांना त्या दिवशी खूप बिझी होते. त्यांना कार्यक्रमांना खूप उशीर झाला. मुख्यमंत्र्यांनी संध्याकाळी साडेसहा वाजेचे निमंत्रण दिले होते. त्यांना उशीर झाला असेल म्हणून गेले नसतील. त्यातून काही वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

ब्लॅकमेल केले असेल तर पवार साहेबांनी सांगावे

माजी आमदार रमेश कदम यांनी छगन भुजबळ यांच्यावर मोठा आरोप केला होता. भुजबळ यांनी तुरुंगात असताना शरद पवार यांना ब्लॅकमेल केले होते, असा दावा रमेश कदम यांनी केला होता. भुजबळ यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. मला सांगा कसे ब्लॅकमेल केले? ब्लॅकमेल केले असेल तर पवार साहेबांनी सांगावे, असे आव्हानच त्यांनी दिले. मी आजारी होतो. हॉस्पिटलमध्ये जावून कागदपत्रं तपासा ना. आपण घरच्यांना सांगतो, साहेबांना जावून सांगा. मदत मागतोचं ना आपण? रमेश कदम यांना ब्लॅकमेल शब्दाचा अर्थ माहित नसावा, असा चिमटाही त्यांनी काढला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -