घरमहाराष्ट्रवकिलाचे तोंड बंद ठेवण्यासाठी जादुटोणा, खाटिकने फोटो काढून मौलानाला पाठवले

वकिलाचे तोंड बंद ठेवण्यासाठी जादुटोणा, खाटिकने फोटो काढून मौलानाला पाठवले

Subscribe

धुळे : वकिलाने अंतिम सुनावणीच्या वेळेस आरोपी विरोधात जास्त बोलू नये किंवा त्याच्यावर नियंत्रण राहावे यासाठी जादूटोणा करण्याचा प्रकार धुळे येथे उघडकीस आला आहे. धुळे न्यायालयात सुरू असलेल्या अंतिम युक्तीवादात विरोधी पक्षकाराच्या वकिलावर नियंत्रण ठेवण्यासाठी धुळे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत परिसरात वकिलाचे फोटो काढून ते नाशिक येथील मौलाना याला व्हाट्सअपद्वारे पाठवून जादूटोणा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

धुळे न्यायालयातील वकील शामकांत रावजी पाटील यांनी जादूटोणाविरोधी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावजी पाटील यांच्या तक्रारीवरून आरोपी निसार शेख अमीर खाटीक याला जादूटोणा प्रतिबंधक कायदा, नरबळी आणि इतर अघोरी प्रथा कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पुण्यातील किसळवाणा प्रकार : जादूटोण्यासाठी सुनेच्या मासिक पाळीचं रक्त विकलं

धुळे न्यायालयात निसार शेख अमिर खाटीक आणि पंढरीनाथ भिला पाटील या दोघांची दिवाणी दावा क्र २१९/ २९१६ प्रमाणे न्यायालयीन कारवाई सुरू आहे. धुळे येथील दिवाणी वरीष्ठ न्यायाधीश यांच्या न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सदर दाव्याच्या अंतिम युक्तीवादामध्ये पंढरीनाथ भीला पाटील यांचे वकील शामकांत पाटील यांनी जास्त बोलू नये किंवा त्यांच्यावर नियंत्रण राहावे यासाठी धुळे न्यायालयातील इमारत परीसरामध्ये परवानगी न घेता पंढरीनाथ भिला पाटील आणि त्यांचे वकील शामकांत पाटील यांचे फोटो काढून ते जादुटोणा करण्याच्या उद्देशाने नाशिक येथील एका मौलानाच्या व्हॉट्सअपवर पाठविण्यात आले.

- Advertisement -

याबाबत शामकांत पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित संशयित आरोपी निसार शेख आमिर खाटीक याची चौकशी करताना त्याच्या मोबाईलचीही तपासणी केली असता ही बाब उघड झाली. याबाबत शामकांत पाटील यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर शहर पोलिसांनी आरोपी निसार शेख समीर खाटीक याला देवपूर येथून अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांची टीम करत आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -