पुण्यात पत्नीची माफी मागणारे पोस्टर

‘हॅप्पी anniversary, सॉरी अप्पू' म्हणत पुण्यातील हडपसरमधील विविध भागात फ्लेक्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा पोस्टरची चर्चा रंगली आहे.

sorry appu happy anniversary posters in pune
पुण्यात पत्नीची माफी मागणारे पोस्टर

दोन दिवसांपूर्वी ‘सविताभाभी तू इथच थांब’ या पोस्टरमुळे पुणेकर चक्रावले होते. मात्र, आता त्यानंतर पुन्हा एकदा पुण्यातील पोस्टर हा चर्चेचा विषय ठरला आहे. कोणाचेही नाव न घेता पुण्यात लावण्यात आलेल्या होर्डिंगमुळे पुणेकरांमध्ये एकच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. दरम्यान, हडपसर भागात पत्नीची माफी मागणारे पोस्टर लावण्यात आले आहे. हडपसरमध्ये हे पोस्टर सध्या चर्चेचा विषय असून याबाबत पुणेकर सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. ‘हॅप्पी anniversary, सॉरी अप्पू’ म्हणत हडपसरमधील विविध भागात फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

काय आहे हे होर्डिंग?

आपल्या नाराज पत्नीला मनवण्यासाठी एका डॉक्टरने हे होर्डिंग लावले असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार; दोघेही पती – पत्नी डॉक्टर असून त्यांचा घटस्फोटाचा दावा न्यायालयात सुरु आहे. या पांढऱ्या होर्डिंगवर ‘हॅप्पी anniversary, सॉरी अप्पू’, असे लिहिण्यात आले आहे. याशिवाय इतर काहीही लिहिलेले नाही. त्यामुळे पोस्टर कोणी आणि का लावले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काही महिन्यांपूर्वी ‘शिवडे,आय एम सॉरी’ या पोस्टरची पुण्यात जोरदार चर्चा रंगली होती. त्यानंतर पिंपरीतील ‘स्मार्ट बायका कुठे जातात’, असा मजकूर असलेली पोस्टर व्हायरल झाली होती. त्यामुळे पुणे आणि पिंपरीमध्ये सध्या प्लेक्स लावून जाहीर माफी मागण्याची नवी पद्धत असल्याचे मत काहीजण व्यक्त करत आहेत.


हेही वाचा – राज ठाकरे संतापले; गद्दारांची २ दिवसांत पक्षातून करणार हकालपट्टी