coronavirus : दादा माणूस ! 50 लाखांचे तांदूळ गरजूंना दान

dada

भारताचा माजी कर्णधार आणि डावखुरा सलामीचा फलंदाज सौरभ गांगुली आपल्या क्रिकेटमधील कामगिरीच्या निवृत्तीनंतरही काही ना काही कारणाने सामाजिक जीवनातही चर्चेत असते. अशीच चमकदार कामगिरी करणाऱ्या सौरभ गांगुलीने करोनासारख्या संकटाच्या काळातही आपल्या मनाचा दादापणा दाखवून दिला आहे. करोनाचा लढाईत गरजूंना ५० लाखांची मदत सौरभ गांगुलीने केली आहे. या ५० लाख रूपयांचा तांदुळ गरजूंना देण्यात येणार आहे.

दादा सौरभ गांगुलीसोबतच क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल, अध्यक्ष अभिषेक दालमिया यांनीही अनुक्रमे २५ लाख रूपये आणि ५ लाख रूपये देण्यात आले. पश्चिम बंगालच्या आपत्कालीन निधीच्या माध्यमातून हे पैसे देण्यात येणार आहेत. सध्या बीसीसीआय अध्यक्ष पदावर असलेला सौरभ गांगुली देशात आयपीएलच्या सिझनमुळे चर्चेत आहे. पण आपले समाजासाठीचे देणे म्हणून त्यांनी गरजूंसाठी मोठी मदत जाहीर केली आहे. हा तांदुळ गरजूंना वितरीत करण्यात यावा म्हणून सौरभ गांगुलीने कोलकात्याच्या पोलिस आयुक्तांनाही पत्र लिहिले आहे. शासकीय शाळांमध्ये सुरक्षा आणि संरक्षणासाठी ठेवण्यात आलेल्या गरजू लोकांसाठी हे तांदुळ देण्यात येणार आहेत. देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन पाहता ही मदत गरजूंसाठी मोठी ठरणार आहे. सौरभ गांगुलीने याबाबतचा एक व्हिडिओदेखील ट्विटरवर पोस्ट केला आहे.