घरमहाराष्ट्र'आज 'चाणक्य' लाडू खात असले तरी...' उद्धव ठाकरेंसाठी दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज...

‘आज ‘चाणक्य’ लाडू खात असले तरी…’ उद्धव ठाकरेंसाठी दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांच्या पोस्टचा विषय ठरतोय चर्चेचा

Subscribe

एका नामंकित दाक्षिणात्य अभिनेत्याने उद्धव ठाकरे यांचं कौतुक करत भाजपवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे.

विधानपरिषदेची निवडणूक(vidhan parishad nivadnuk) झाली आणि त्या नंतर शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे(eknath shinde) यांनी बंडखोरी करून सुरत गाठलं आणि नंतर गुवाहाटी. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला बहुमत गमवावं लागलं आणि त्या नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने महाविकास आघडी सरकार अखेर कोसळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे( cm uddhav thackeray) यांनी राजीनामा दिल्याने बहुमत चाचणी मात्र टळली. या सगळ्या घाटना घडामोडी नंतर भाजपच्या वतीने सरकार स्थापण्यासाठी दावा सुद्धा केला जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्या नंतर राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अश्याच प्रतिक्रिया मनोरंजन क्षेत्रामधून सुद्धा येत आहेत. एका नामंकित दाक्षिणात्य अभिनेत्याने उद्धव ठाकरे यांचं कौतुक करत भाजपवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे.

 

- Advertisement -

हे ही वाचा – मला अडीच वर्षे सहकार्य केल्‍याबद्दल सर्वांचे धन्‍यवाद!

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर सतत चर्चेत असणारे दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनी उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. सोबतच उद्धव ठाकरे यांची उत्तम काम केले आहे असं सांगत, ‘चाणक्य’ असं म्हणत अभिनेते प्रकाश राज(actor prakash raj) यांनी भाजप वर निशाणा साधला. भाजप मधल्या नेत्यांना सुद्धा प्रकाश राज यांनी लक्ष्य केलं. उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलला टॅग करत प्रकाश राज यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
”उद्धव ठाकरे सर, तुम्ही उत्तम काम केलं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही राज्यतील परिस्थिती हाताळली ती पाहता मला विश्वास आहे, की महाराष्ट्रातील जनता तुमच्या पाठीशी उभी राहील. आज ‘चाणक्य’ लाडू खात असले तरी तुमचा प्रामाणिकपणा दीर्घकाल टिकून राहणारा आहे. तुम्हला अधिक शक्ती मिळो.” असं अभिनेते यांनी प्रकाश राज यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

 

हे ही वाचा – मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा राजीनामा

एकनाथ शिंदे(eknath shinde) यांनी बंड केल्यामुळे ठाकरे सरकारने बहुमत गमावले आणि त्याच संदर्भात भाजपने राज्यपालांना पत्र दिले आणि त्यामुळे राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश सुद्धा दिले. या बहुमत चाचणीला शिवसेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान सुद्धा देण्यात आले. रात्री नऊच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेली याचिका फेटाळली आणि त्यानंतर थोड्याच अवधीत उद्धव ठाकरे(uddhav thackeray) यांनी त्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आणि राजीनामा सादर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राजभवन गाठले.

हे ही वाचा – उद्धवसाहेब दुखावले नाही पाहिजेत, दीपक केसरकरांनी व्यक्त केली भावना

 

एकनाथ शिंदे(eknath shinde) यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. दिवसागणिक एकनाथ शिंदे यांच्या गटात बंडखोर आमदारांची संख्या वाढतच गेली. पण एकूणच या सगळ्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांचं भाषण महाराष्ट्रातील जनतेला भावुक करणारं होतं. त्याचबरोबर राज्यातील जनतेच्या मनात उद्धव ठाकरे(uddhav thackeray) यांच्याबद्दल एक हक्काचं आणि आपुलकीचं स्थान निर्माण झालेलं आहे.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -