मुंबईत कोरियाच्या युट्यूबर तरुणीची छेडछाड; व्हिडीओ व्हायरल

मुंबईत एका कोरियन युट्यूबर तरुणीची छेडछाड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोरियन तरुणीची छेडछाड करतानाचा लाईव्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. खार परिसरात रात्री 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

मुंबईत एका कोरियन युट्यूबर तरुणीची छेडछाड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोरियन तरुणीची छेडछाड करतानाचा लाईव्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. खार परिसरात रात्री 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ही तरुणी लाईव्ह स्ट्रिमिंग करत असताना हा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.(south Korean youtuber girl sexually harassed at Khar in Mumbai video goes viral)

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरियाची युट्यूबर तरुणी रात्रीच्या वर्दळीच्या वेळी मुंबईत फिरत होती. खार भागात रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना होती. पोलिसांनी याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही. परंतू, या प्रकरणात लक्ष घालत असल्याचे म्हटले आहे.

ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडीओच्या माध्यमातून पोलिसांनी त्या व्हिडीओमध्ये तरूणीची छेड काढणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे.

एका कोरियन युट्यूबर तरुणीची छेडछाड करतानाचा लाईव्ह व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये दोन तरुणांपैकी एकजण तिच्या खूप जवळ आला आणि तिने विरोध करूनही तो तिच्या हाताला पकडून स्कूटरवर बसविण्यासाठी ओढत होता. तसेच ती आली नाही म्हणून तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला किस करण्याचाही प्रयत्न केला. यावेळी तिने नो, नो असे म्हणत त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न केला. यावरच हे तरुण थांबले नाहीत तर ती पुढे जात असताना पुन्हा मागून स्कूटर घेऊन आले आणि तिला आम्ही सोडतो, आमच्यासोबत बस असे सांगू लागले. यावेळी तिने माझे घर इथेच समोर आले असे सांगितले, तरी देखील हे तरुण तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हते. पोलिसांनी तक्रार आलेली नसली तरी चौकशी सुरु केली आहे. व्हायरल व्हिडीओत दिसणाऱ्या व्यक्तीची ओळख पटविली जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


हेही वाचा – Gram Panchayat Election : सरपंचपदाच्या उमेदवाराची निवडणूक खर्चाच्या मर्यादेत वाढ