रणवीर सिंगचे न्यूड फोटो चालतात, मग हिजाबला विरोध का? अबू आझमींचा सवाल

sp mla abu azmi on ranveer singh nude photoshoot and hijab row solapur pc

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग न्यूड फोटोशूटमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. त्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. रणवीरच्या या फोटोंवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. तर काहींनी रणवीरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मात्र अनेकांकडून या फोटोंवर उलट-सुलट प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. आता समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी देखील रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर टीका केली आहे. त्यांनी या न्यूड फोटोशूटचा संबंध हिजाबशी जोडला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशात न्यूड फोटोशूट खपवून घेतले जाते. मग मुस्लीम महिला मर्जीने परिधान करत असलेल्या हिजाबला विरोध का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ते सोलापूर पत्रकार परिषदेत बोलत होते.

अबू आझमी म्हणाले की, देशात अभिनेत्यांना नग्न फोटोशूट करण्यास परवानगी आहे, मग संपूर्ण शरीर झाकणाऱ्या हिजाबला विरोध का केला जातो? हिजाब परिधान करण्यावर काय अडचण आहे? संपूर्ण जगभरात हिजाब परिधान केला जातो. इस्माम धर्मात महिलांना संपूर्ण शरीर झाकणारे हिजाब परिधान करण्याचा धार्मिक अधिकार आहे, या देशाने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं त्यामुळेच मी पाकिस्तानात गेलो नाही, पण आज देशात मुस्लिमांवर अनेक बंधने घातली जात आहेत.

मुस्लीम महिला हिजाबच्या आतमध्ये काहीतरी चोरून आणतील किंवा लहान मुलांना चोरून नेतील अशी भीती वाटत असल्यास, हिजाब परिधान करून येणाऱ्या संबंधित विभागात एका महिलेला तपासणीस बसवा, त्या संबंधित महिलेकडून मुस्लीम महिलांची तपासणी करा, याचा कुणाचा विरोध नाही, मात्र तुम्ही हिजाबवर बंदी कशी घालू शकता? असा सवालही त्यांनी उपस्थित केला,

देशातील 130 कोटी जनतेला सांगू इच्छितो की, अलीकडे अभिनेत्यांचे नग्वावस्थेतील फोटो व्हायरल होच आहे. ते फोटो सर्वजण पाहत आहेत. पण यावर एकही जण बोलला नाही, कोणीही त्या फोटोंवर बंदी आणली नाही किंवा कुठेही गुन्हे दाखल करण्यात आला नाही. पण एखादी महिला हिजाब परिधान करून बाहेर गेली किंवा परीक्षेवा गेली तर तिला अडचणी येत आहेत, त्यामुळे मुस्लीम महिलांच्य हिजाब प्रकरणाला धार्मिकतेचा रंग दिला जात आहे. असही अबू आझमी म्हणाले.


रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटवर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस