मुख्यमंत्र्यांसंदर्भात बोलताना किरीट सोमय्यांची जीभ घसरली, म्हणाले…

अनिल परब यांनी महावितरणाला अर्ज केला, त्यावर सही अनिल दत्तात्रय परबची आहे. हा चेहरा पाहिलाय की नाही?, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री किती लबाडी करायची. असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिलेला नसल्याचं सांगत किरीट सोमय्यांची जीभ घसरली.

bjp leader kirit somaiya question to thackeray government over the Buldhana Co-operative Credit Society

मुंबईः भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परबांवर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे यावेळी ते टीका करताना अनिल परबांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घसरले आहेत.

त्यांनी दापोलीतील साई रिसॉर्टच्या वीज कनेक्शनचा अर्ज दाखवला, त्यातील सही आणि फोटोवरून त्यांनी अनिल परबांवर निशाणा साधलाय. हा फोटो तो मी नव्हे मधल्या पणशीकरांचा आहे, की तो मी नव्हेमधल्या अनिल परबचा आहे, अनिल परब यांनी महावितरणाला अर्ज केला, त्यावर सही अनिल दत्तात्रय परबची आहे. हा चेहरा पाहिलाय की नाही?, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री किती लबाडी करायची. असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिलेला नसल्याचं सांगत किरीट सोमय्यांची जीभ घसरली.

मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन अनिल परब सांगतात साहेब मी मीडियाला फसवलं, गंडवलं, तो मी नव्हेच. हा अर्ज 2 मार्च 2020 रोजी केला आहे. 100 टक्के लॉकडाऊनचा महिना आणि काय अर्ज केला आहे. कार्यकारी अभियंता महावितरण दापोली अनिल दत्तात्रय परब, राहणार मुंबई, मौजे मुरूड वरची पाखाडी येथे इमारतीच्या बांधकामाकरिता थ्री फेज मीटर मिळण्याबाबत अर्ज केला आहे. वरील विषयावर विनंतीपूर्वक अर्ज करत असून, स्वमालकीच्या घरासाठी थ्री फेज मीटर मंजूर करावे, असंही किरीट सोमय्यांनी सांगितलंय. विशेष म्हणजे महावितरणाने काहीही न पाहताना मीटर दिल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय.

आता अनिल परबांचा सातबारा कोरा करणार आहे, साई रिसॉर्टचा टॅक्स अनिल परबांनी भरला, मग रिसॉर्ट कदमांचा कसा?, कदम आणि परबांचे पोपट आता बोलायला लागले. अनिल परबांनी नौटंकी बंद करावी. 1 रुपयांचा शेअर 500 रुपयात जाधवांनी विकला. यशवंत जाधव यांच्यानंतर श्रीधर पाटणकर हाजीर हो, असं म्हणत किरीट सोमय्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना इशारा दिलाय.


हेही वाचाः आता अनिल परब यांनी बोजा बिस्तरा तयार ठेवावा, किरीट सोमय्यांचा इशारा