घरउत्तर महाराष्ट्रविशेष : अब्रू तर जाते पण कुटुंबाचं पोट भरतं यातच समाधान; देहविक्री...

विशेष : अब्रू तर जाते पण कुटुंबाचं पोट भरतं यातच समाधान; देहविक्री करणार्‍या महिलांची व्यथा

Subscribe

आज आम्ही रस्त्यावर उभं राहून आमची इज्जत विकतो. आपले शरीर विक्री करायला कुणाला आवडेल पण मजबुरी आहे साहेब. घरात चार जण आणि मी स्वतःअसे पाच जण राहतात. घरात कर्ता पुरूष नसल्याने आमच्यावर ही वेळ आली. पण माझयामुळेे घरातील कुटुंबातील सदस्य दोन वेळचे जेवण तरी करतात यातच मोठे समाधान आहे असे सांगताच नताशा (नाव बदलले आहे) च्या डोळयांत पाणी तरळले. आज जागतीक वारांगना हक्क दिवस. यानिमित्ताने वारांगणांच्या वस्तीत शरीर विक्रीय करणारया महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या.

वेश्या हा शब्द ऐकूनच काहीजण नाक मुरडतात. परंतु हा व्यवसाय वाईट असला तरी या चक्रात कोवळ्या मुली व महिलांना बळजबरीने ढकलले गेले आहे. या व्यवसायात अडकलेल्या सगळ्याच महिला स्वखुशीने येत नाहीत. ही त्यांची व्यथा आहे. तिच्या आत स्त्री’ आहे. कुणातरी नराधमांच्या जाळ्यात अडकून तिच्या आयुष्याची राखरांगोळी झाली आहे. आज जर त्यांना विचारले ह्या क्षेत्रात तुम्ही कसे? तर एकच उत्तर ऐकायला मिळेल, ते म्हणजे ह्या क्षेत्रात आम्ही आवड म्हणून किंवा छंद म्हणून नाही तर गरज म्हणून आलो आहे. कुटुंबाचे पालन पोषण करण्याची जबाबदारी ही पूर्णपणे आमच्यावरच आहे त्याचबरोबर आम्हाला आमच्या मुलांचा शिक्षणाची आणि भविष्याची चिंताही सतावते. परंतू आपले शरीर कोणाला विकायला आवडेल साहेब.

- Advertisement -

नाशिकच्या वारांगणांच्या वस्तीत अशा अनेक महिला आहेत ज्या शरीर विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कोरोनाला हरविण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये एका बाजूला प्रस्थापित लोक आनंदात लॉकडाउनचे दिवस आपल्या कुटुंबांसमवेत घालवत होते तर या महिलांवर चक्क उपासमारीची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. मुलांचे शिक्षण, बहिणींचे विवाह, म्हातार्‍या आईवडिलांचे आजारपण सर्व यांच्या कमाई वर होते. रस्त्यावर ग्राहक शोधण्यामुळे आमचा चेहरा परिचयाचा झाला, त्यामुळे कोणी काम देत नाही. जर कामावर ठेवलेच तर वेगळ्या नजरेने पाहतात. त्यामुळे इच्छा नसतांनाही हा व्यवसाय करावा लागतो अशी व्यथा या महिलांनी मांडली. आज नाशिकच्या या वारांगनांच्या वस्तीत अशा अनेक महिला आहेत ज्या, केवळ कुटुंबातील सदस्यांना दोन वेळचे अन्न मिळावे म्हणून या व्यवसायात असल्याची व्यथा या महिलांनी मांडली.

जीव मुठीत घेऊन व्यवसाय

आमच्याकडे येणारे ग्राहक शरीराची भुक भागविण्यासाठी येत असतात. परंतू हे ग्राहक कुठून येतात याची माहिती नसते. हा व्यवसाय करतांना मोठी जोखीमही पत्कारावी लागते. अनेकदा काही ग्राहक शिवीगाळ करतात. मारहाण करतात परंतू कुटुंबासाठी सर्वकाही निमूटपणे सहन करावे लागत असल्याची भावनाही या महिलांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -