घरमहाराष्ट्रशनिवार, रविवारी रेल्वेचा विशेष ब्लॉक; लोकलच्या अशंत: फेऱ्या रद्द

शनिवार, रविवारी रेल्वेचा विशेष ब्लॉक; लोकलच्या अशंत: फेऱ्या रद्द

Subscribe

मुंबई – बदलापूर स्थानकातील सार्वजनिक पूल पाडण्याकरता आणि रेल्वे मार्गांच्या दुरुस्तीकरता मध्यरात्रीन विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. या विशेष मध्यकालीन रेल्वे ब्लॉकमध्ये काही फेऱ्या रद्द तर काही फेऱ्या मर्यादित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शनिवारी, रविवारी कुठे बाहेर जाण्याचा प्लान आखत असाल तर हे वेळापत्रक वाचूनच घराबाहेर पडा.

बदलापूर स्थानकातील सार्वजनिक पादचारी पूल पाडण्यासाठी आणि नेरळ येथे पादचारी पुलाचे गर्डर्स लॉन्च करण्यासाठी दोन दिवस मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

- Advertisement -

असा असेल विशेष मेगा ब्लॉक

स्थानक – अंबरनाथ ते वांगणी

- Advertisement -

मार्ग – अप आणि डाऊन

वेळ – मध्यरात्री १.२५ ते पहाटे ३.५५ पर्यंत (शनिवार मध्यरात्र )

स्थानक – वांगणी ते भिवपुरी रोड

मार्ग – अप आणि डाऊन

वेळ – मध्यरात्री ०१.४० ते पहाटे ०३.३०

कर्जत लोकल अंबरनाथपर्यंत

शनिवार रात्री १२.२४ ची सीएसएमटी कर्जत लोकल अंबरनाथ स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहे. मध्यरात्री २.३३ ची कर्जत सीएसएमटी लोकल अंबरनाथ स्थानकातून चालवण्यात येईल.

या एक्स्प्रेस कर्जत-पनवेल-दिवा मार्गे

भुवनेश्वर-मुंबई कोणार्क (११०२०), हैद्रराबाद-मुंबई (१२७०२) आणि विशाखापट्टणम-एलटीटी (१८५१९) या एक्स्प्रेस कर्जत-पनवेल-दिवा मार्गे चालविण्यात येणार आहे. कल्याणला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पनवेल आणि दिवा येथे या गाड्यांना थांबा देण्यात येणार आहे. यामुळे या गाड्या १५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत. गदग-मुंबई एक्स्प्रेस (१११४०) वांगणी स्थानकात थांबवण्यात येणार असल्याने ही गाडी २० मिनिटे विलंबाने मुंबईत दाखल होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -