घरमहाराष्ट्रमहाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्तांच्या सोयीसाठी बेस्टची विशेष बससेवा

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्तांच्या सोयीसाठी बेस्टची विशेष बससेवा

Subscribe

मुंबई : येत्या रविवारी (१८ फेब्रुवारी) मुंबईसह देशभरात ‘महाशिवरात्री’ साजरी करण्यात येणार आहे. बेस्ट उपक्रमाने, ‘महाशिवरात्री’च्या निमित्ताने शिवभक्तांना शिवदर्शन घेता यावे, यासाठी विशेष बस गाड्यांची व्यवस्था केली आहे. बाबूलनाथ मंदिर, संजय गांधी नॅशनल पार्क ते कान्हेरी गुंफा अशी ही सेवा असल्याने शिवभक्तांना बेस्टप्रवास सोयीचा ठरणार आहे.

मुंबईत बाबूलनाथ, कान्हेरी गुंफा आदी ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने शिवभक्त शिवदर्शनासाठी येत असतात. त्यांना घरातून निघाल्यावर बाबूलनाथ मंदिर व कान्हेरी गुंफा या दरम्यान प्रवास करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने बेस्टच्या जादा व विशेष बसगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

बेस्ट उपक्रमाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रवेशद्वार ते कान्हेरी लेणी या मार्गावर बसमार्ग क्रमांक 188 (मर्यादित)च्या सहा अतिरिक्त बसगाड्या सकाळी 10.30 ते सायंकाळी 7.30 या दरम्यान चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बाबूलनाथ मंदिरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी बसमार्ग क्र. 57 (वाळकेश्वर ते पी.टी. उद्यान- शिवडी), बसमार्ग क्र. 67 (वाळकेश्वर ते अँटॉप हिल) आणि बसमार्ग क्र. 103 (वाळकेश्वर ते कुलाबा बसस्थानक) या तिन्ही मार्गांवर सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सहा अतिरिक्त बसगाड्या चालविण्यात येणार आहेत, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे उपजनसंपर्क अधिकारी मनोहर गोसावी यांनी दिली.

एसी इलेक्ट्रिक दुमजली बस मुंबईकरांच्या सेवेत
बेस्ट उपक्रमाची एसी इलेक्ट्रिक दुमजली बस बेस्टच्या परिवहन विभागाच्या बस ताफ्यात नुकतीच दाखल झाली. विशेष म्हणजे या बसला दोन दरवाजे आहेत. जुन्या डबल डेकर बसला एकच दरवाजा होता. त्यामुळे आता मुंबईकरांची गैरसोय होणार नाही. या बसमध्ये, आधुनिक पद्धतीची आसन व्यवस्था आहे. खालील भागात 35 आसने तर वरील भागात 30 आसने, अशी एकूण 65 आसनांची व्यवस्था या बसमध्ये आहे. बेस्टने जुन्या दुमजली बसगाड्या भंगारात मोडीत काढत त्याऐवजी आता नवीन एसी इलेक्ट्रिक दुमजली गाड्या सेवेत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ही बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. एका बसची किमत 60 कोटी आहे.

- Advertisement -

हेही वाचा – खिडकीतली जागा बदलून वर्गातील मध्यभागी बसवायला हवं.., फडणवीसांच्या गौप्यस्फोटावर सुळेंचा टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -