घरक्राइमअनिल देशमुखांना दिलासा नाहीच; सीबीआय न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच; सीबीआय न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

Subscribe

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra former Home Minister Anil Deshmukh) यांचा सीबीआय (CBI) कोठडीतला मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुखांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra former Home Minister Anil Deshmukh) यांचा सीबीआय (CBI) कोठडीतला मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुखांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला. देशमुखांसह सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

मागील अनेक महिन्यांपासून अनिल देशमुख १०० कोटींच्या घोटाळ्याच्या (Hundred crore scams) आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत (Judicial custody) आहेत. कोठडीतून बाहेर येण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. (Special CBI Court rejects default bail Maharashtra former Home Minister Anil Deshmukh)

- Advertisement -

अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप

मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. शिवाय, बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि इतरांना बार आणि रेस्टॉरंटमधून महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोपही त्यांनी केला होता. या प्रकरणी नोव्हेंबर २०२१ मध्ये ७२ वर्षीय देशमुखांना ईडीनं अटक केली.

- Advertisement -

५९ पानांचे आरोपपत्र दाखल

शिवाय, अनिल देशमुखांसह संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांच्या विरोधात सीबीआयने ५९ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबई पोलीस दलातील बरखास्त पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) हा या प्रकरणातील माफीचा साक्षीदार बनला आहे. त्यानुसार, दरमहा १०० कोटींच्या कथित खंडणी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांनुसार, सीबीआयने पहिला गुन्हा नोंदवत तपास सुरू केला होता. त्यानंतर ईडीने याच एफआयआरमध्ये अनिल देशमुखांसह इतरांना अटक केली. त्यानंतर हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असताना एप्रिल २०२२ मध्ये सीबीआयने अनिल देशमुखांसह संजीव पालांडे, कुंदन शिंदे आणि सचिन वाझेला आर्थर रोड कारागृहातून ताब्यात घेतले.


हेही वाचा – लोकसभेतही शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर! 19पैकी 14 खासदारांचा स्वतंत्र गट?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -