Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी हसन मुश्रीफांना न्यायालयाचा दिलासा; अटकपूर्व जामीनावरील निकाल 5 एप्रिलला

हसन मुश्रीफांना न्यायालयाचा दिलासा; अटकपूर्व जामीनावरील निकाल 5 एप्रिलला

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवरील सुनावणी आज न्यायालयात पार पडली. या याचिकेवर झालेल्या सुनावणीचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. या याचिकेवरील निकाल येत्या ५ एप्रिलला न्यायालय देणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवरील सुनावणी आज न्यायालयात पार पडली. या याचिकेवर झालेल्या सुनावणीचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. या याचिकेवरील निकाल येत्या ५ एप्रिलला न्यायालय देणार आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे पुढील सुनावणीपर्यंत हसन मुश्रीफ यांना अटक होणार नाही. त्यामुळे विशेष पीएएमएलए न्यायालय हसन मुश्रीफ यांच्याबाबत काय निकाल देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Special pmla court important order on hasan mushrif pre arrest bail)

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ हे सध्या ईडी कारवाईच्या ससेमिऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या कोल्हापुरातील कागल येथील घरी ईडी अधिकाऱ्यांनी दोन वेळा छापेमारी केली. या छापोमारीतून ईडी अधिकारी त्यांच्या घरातून काही महत्त्वाची कागदपत्रे घेऊन गेल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ईडी अधिकाऱ्यांनी हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण मुश्रीफांनी सुरवातीला चौकशीला जाणे टाळले होते. त्याऐवजी त्यांनी न्यायालयात अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी पावले उचलली.

- Advertisement -

त्यानुसार, हसन मुश्रीफ यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायलयात धाव घेतली. हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयात आज युक्तिवाद झाला. या प्रकरणी न्यायाधीशांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला. या प्रकरणी विशेष पीएएमएलए न्यायालयात सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्याने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. पण न्यायालयाने या प्रकरणाचा तातडीने निकाल जाहीर केला नाही. न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला. तसेच येत्या 5 एप्रिलला याबाबतचा निकाल देणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

दरम्यान, विशेष पीएएमएलए कोर्टाकडून निकाल जाहीर करण्यात आला नसल्याने हसन मुश्रीफ यांना अटकेपासून संरक्षण मिळणार आहे की, अटक होईल याबाबतची साशंकता वाढली आहे. कोर्ट काय निकाल देईल यावर मुश्रीफांचं पुढील भवतव्य अवलंबून राहणार आहे. मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्याच प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे.


- Advertisement -

हेही वाचा –  भाजपा मुख्य कार्यालयाच्या विस्ताराचे लोकार्पण, पंतप्रधान मोदींनी दिली ‘ती’ माहिती…

- Advertisment -