घरमहाराष्ट्रSanjay Raut : "ते लढतील व जिंकतील" ईडीच्या निशाण्यावरील वायकरांसाठी राऊतांची विशेष...

Sanjay Raut : “ते लढतील व जिंकतील” ईडीच्या निशाण्यावरील वायकरांसाठी राऊतांची विशेष पोस्ट

Subscribe

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून ईडी, सीबीआय आणि अन्य विशेष तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांच्या चौकशा केल्या जात आहे. त्यातही ठाकरे गटाचे आमदार आणि नेते मंडळींना लक्ष्य करण्यात आले आहे. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची गेल्या महिन्यात दोन वेळा ईडीकडून चौकशी करण्यात आली. ज्यानंतर ते या चौकशीच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी ठाकरे गटाला रामराम करून भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. परंतु, अद्याप तरी त्यांनी ठाकरे गटातून बाहेर पडण्याबाबतची कोणतीही भूमिका घेतलेली नाही. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एक्स या सोशल मीडिया साइटवर रवींद्र वायकर यांच्यासाठी विशेष पोस्ट केली आहे. ते लढतील व जिंकतील. आम्ही त्यांच्या सोबत आहोत, असे त्यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये लिहिले आहे. (Special post by Sanjay Raut for Ravindra Waikar)

हेही वाचा… Sanjay Raut : “देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील गुंडगिरीवर चाय पे चर्चा करावी”, संजय राऊतांचा टोला

- Advertisement -

जोगेश्वरीतील कथित भुखंड घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर हे ईडीच्या रडारवर आहेत. मागील महिन्यात दोन वेळा त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. ईडीने वायकरांच्या भोवती फास आवळल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची घरी जाऊन भेट घेतली. परंतु, त्याआधी वायकरांच्या ठाकरे गटातून बाहेर पडण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. ठाकरे गट सोडा, पक्षांतर करा अशा पद्धतीने वायकरांना धमकाविले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आला होता. परंतु, वायकर लढत आहेत, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

संजय राऊत यांनी रवींद्र वायकर यांच्यासाठी पोस्ट करत लिहिले आहे की, “शिवसेनेतील आमचे सहकारी नेते आमदार रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून ED वैगरे तपास यंत्रणांच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहे. येत्या काही दिवसात शिवसेना सोडा.. पक्षांतर करा.. नाहीतर तुरुंगात जा.. असे त्यांना धमकावले जात आहे. हा एक प्रकारे दहशतवाद आहे. असे राजकारण या आधी कधीच घडले नव्हते.. रवींद्र वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत.. ते लढतील व जिंकतील. आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहोत”, असे या पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे. त्यामुळे रवींद्र वायकर हे नेमका काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

जोगेश्वरीतील कथित भुखंड घोटाळा प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती समजले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांच्याविरुद्ध 9 जानेवारी रोजी ईडीने कारवाईचा फास आवळला. यानंतर ईडीने रवींद्र वायकर यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र पहिल्या समन्सला कोणतेही उत्तर न देता ते ईडीच्या कार्यालयात गैरहजर राहिले होचे. परंतु, त्यानंतर त्यांनी 29 जानेवारीला ईडी कार्यालयात चौकशीला हजेरी लावली. त्यादिवशी त्यांची ईडीकडून 9 तास चौकशी करण्यात आली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यसरकारवर टीकास्त्र सोडले. राजकीय दबावातून ईडी चौकशी झाल्याचा आरोप रवींद्र वायकर यांनी केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -