घरमहाराष्ट्रMaratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन, निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन, निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Subscribe

मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा निकाली निघावा, यासाठी आज एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.

मुंबई : मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्यात यावे, यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी चौथ्यांदा उपोषणाला सुरुवात केली आहे. गेल्या 11 दिवसांपासून जरांगे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत आहेत. यासाठीच आज (ता. 20 फेब्रुवारी) राज्य मागासवर्ग आयोगाने एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावले आहे. परंतु, या अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाच्या अहवाला मंजुरी देण्यात येणार आहे. यानंतर विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मांडतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा… Maratha Reservation : “मनोज जरांगेचा कोणीतरी वापर करत आहे”; असीम सरोदेंची शंका

- Advertisement -

राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांनी मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मराठा समाजाच्या मागासलेपणाबाबतचा अहवाल सादर केला. यानंतर आज विशेष अधिवेशन घेण्याचा सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे. विशेष अधिवेशनात सरकारने काढलेल्या सगेसोयरेंच्या कुणबी नोंदी संदर्भातील अधिसूचनेचा मुद्दा येण्याची शक्यता कमी आहे. सामाजिक न्याय विभागाकडे तब्बल साडेचार लाख हरकती आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर, मराठा आरक्षणाच्या विधेयकावर दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा होऊन त्यानंतर विधेयक मंजूर केले जाणार आहे.

11 वाजता मराठा आरक्षणासंदर्भातील या विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण देण्याचा कायदा आजच्या विशेष अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. म्हणजेच आरक्षणाची मर्यादा वाढविण्यात येणार आहे. ज्यामुळे SEBC प्रमाणे 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असल्यास ते सुप्रीम कोर्टात टिकू शकते, असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर, मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला असल्याने घटनेच्या 15(4) आणि 16(4) या अनुच्छेदानुसार आरक्षणास पात्र ठरतो, असा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने दिला आहे.

- Advertisement -

असे असेल आजचे कामकाज…

मराठा आरक्षणाच्या विधेयकावर दोन्ही सभागृहात चर्चा करण्यात येणार आहे. या विशेष अधिवेशनाची सुरुवात सकाळी 11 वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. विधेयकात मराठा समाजाला नोकरीत 12 आणि शिक्षणात 13 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाची विशेष बैठक मागासवर्ग आयोगाने सुपूर्द केलेला अहवाल विधानसभेत मांडला जाणार आहे. परंतु, त्यापूर्वी हा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारणे गरजेचे आहे. त्यासाठी विशेष अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सकाळी मंत्रिमंडळाची विशेष बैठक होणार आहे. या बैठकीनंतर 11 वाजता राज्यपालांचे अभिभाषण आणि अभिभाषणानंतर अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात करण्यात येईल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -