घरताज्या घडामोडीआषाढी एकादशीनिमित्त मराठवाडा ते पंढरपूर विशेष ट्रेन

आषाढी एकादशीनिमित्त मराठवाडा ते पंढरपूर विशेष ट्रेन

Subscribe

आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. पंडरपूरात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता त्यांची गैर सोय होऊ नये यासाठी विशेष गाड्या सोडण्यात येतात. त्यानुसार, रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. पंडरपूरात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता त्यांची गैर सोय होऊ नये यासाठी विशेष गाड्या सोडण्यात येतात. त्यानुसार, रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत. अशातच मराठवाड्यातूनही (Marathwada) अनेक भाविक पंढरपूरच्या दर्शनासाठी जात असतात. त्यामुळे या भाविकांसाठी पंढरपूरपर्यंत विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. (Special train for Pandharpur from marathwada)

जालना, नांदेड आणि औरंगाबादहून पंढरपूर आणि परतीसाठी विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. रेल्वेची ही विशेष सेवा ७ जुलैपासून सुरु केली जाणार आहे. औरंगाबाद, जालना, नांदेड या स्टेशनवरून निघाणाऱ्या गाड्यांमधून वारकरी आणि भक्तांनी योग्य वेळात पंढरपूरला पोहोचावेत, या दृष्टीने रेल्वे विभागाने काळजी घेण्यात आली आहे.

- Advertisement -

मराठवाड्यातील ३ ठिकाणांहून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक

जालना ते पंढरपूर

- Advertisement -
  • 9 जुलै रोजी संध्याकाळी 7.20 वाजता विशेष गाडी (07468) निघेल.
  • पंढरपूरला दुसऱ्या दिवशी ती सकाळी 6.30 वाजता पोहोचेल.
  • परतीच्या प्रवासाला 10 जुलै रोजी रात्री 8.30 वाजता पंढरपूरवरून (07469) सुटेल.
  • दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता जालन्याला पोहोचेल.
  • या गाडीत एसी, सेकंड क्लास (स्लीपर), जनरल असे 13 डबे असतील.

औरंगाबाद ते पंढरपूर

  • 9 जुलै रोजी औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून विशेष गाडी (07515) रात्री 9.40 वाजता निघेल.
  • दुसऱ्या दिवशी 11.30 वाजता पंढरपूरला पोहोचेल.
  • परतीच्या दिशेने ही गाडी (07516) पंढरपूर स्टेशनवरून 10 जुलै रोजी रात्री 11 वाजता निघेल.
  • दुसऱ्या दिवशी 12.20 वाजता औरंगाबादला पोहोचेल.
  • या गाडीत सेकंड क्लास (स्लीपर) जनरल असे 17 डबे असतील.

नांदेड-पंढरपूर-नांदेड

  • नांदेड रेल्वे स्टेशनवरून विशेष गाडी (07498) 9 जुलै रोजी दुपारी 3 वाजता सुटेल.
  • दुसऱ्या दिवशी सकाळी 10.35 वाजता पंढरपूरला पोहोचेल.
  • परतीच्या दिशेने ही गाडी (07499) पंढरपूर स्टेशनवरून 10 जुलै रोजी रात्री 9.21 वाजता सुटेल.
  • दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6.50 वाजता नांदेडला पोहोचेल.
  • या गाडीत एसी, सेकंड क्लास (स्लीपर), जनरल असे 18 डबे असतील.

हेही वाचा – शरद पवारांना भारतीय कुस्ती संघटनेचा धक्का: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदच बरखास्त

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -