घरताज्या घडामोडीदिलासादायक! पंढरपूर यात्रेसाठी विशेष रेल्वे गाड्या

दिलासादायक! पंढरपूर यात्रेसाठी विशेष रेल्वे गाड्या

Subscribe

रेल्वे प्रशासनाकडून नागपूर ते पंढरपूर तसेच मिरजसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. ६ ते ११ जुलै या काळात या विशेष गाड्या धावणार असल्याची माहिती मिळते.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे यात्रा होणार आहे. या यात्रेसाठी रेल्वे प्रशासनाकडून नागपूर ते पंढरपूर तसेच मिरजसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. ६ ते ११ जुलै या काळात या विशेष गाड्या धावणार असल्याची माहिती मिळते. (special trains from nagpur to pandharpur and nagpur to miraj for pandharpur yatra)

नागपूर-मिरज विशेष रेल्वे गाडी

- Advertisement -
  • ०१११५ नागपूर-मिरज ही गाडी ६ व ९ जुलै २०२२ रोजी नागपूरवरून ८.५० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी ११.१५ वाजता मिरज येथे पोहचेल.
  • ०१११६ मिरज-नागपूर ही गाडी ७ व १० जुलै रोजी मिरजवरून १२.५५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता नागपूरला पोहचेल.

या गाडीला अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसाबा डोंगरगाव, जत रोड, ढलगाव, कवठे महाकाळ, सालाग्रे व अरग येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एसी थ्रीचे दोन, स्लिपर क्लास ८, सेंकड क्लास ६ असे कोच असणार आहेत.

नागपूर-पंढरपूर विशेष रेल्वे गाडी

- Advertisement -
  • ०१११७ नागपूर-पंढरपूर ही विशेष गाडी ७ व १० जुलै रोजी नागपूरवरून ८.५० वाजता निघेल व दुसऱ्या दिवशी ८.०० वाजता पंढरपूरला पोहचेल.
  • ०१११८ पंढरपूर-नागपूर ही गाडी ८ व ११ जुलै रोजी पंढरपूरवरून १७.०० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता नागपूरला पोहचेल.

अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी येथे या गाडीला थांबा आहे. या गाडीला एसी थ्रीचे दोन, स्लिपर क्लास ८, सेंकड क्लास ६ असे कोच राहतील. या गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रावर सुरू झाले आहे.


हेही वाचा – महाराष्ट्रात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -