घरताज्या घडामोडीडिफेंस व नेव्हल अ‍ॅकॅडमीच्या परीक्षांसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या धावणार!

डिफेंस व नेव्हल अ‍ॅकॅडमीच्या परीक्षांसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या धावणार!

Subscribe

यूपीएससीतर्फे आयोजित नॅशनल डिफेन्स अकेडमी व नेव्हल अ‍ॅकॅडमी परीक्षा रविवारी (६ सप्टेंबर) मुंबई आणि नागपूर येथील मुख्य केंद्रांवर होणार आहे. उमेदवारांना परीक्षा केंद्रांवर पोहोचता यावे यादृष्टीने मध्य रेल्वेकडून शनिवार व रविवारी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहे. त्यामुळे या परिक्षार्थींना दिलासा मिळणार आहे. तसेच प्रवासादरम्यान परिक्षार्थींनी कोविड संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नियमांचे पालन करावयाचे आहे.

कोरोना पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षेला वेळेत पोहोचता येणेही मुश्कील होते. खासगी वाहनातून जायचे झाल्यास ई पास काढणे, तो वेळेत मिळणे न मिळणे अशा अनंत अडचणी होत्या. या पार्श्वभूमीवर अ‍ॅकॅडमीच्या परीक्षा विभागाने रेल्वे आणि एसटी महामंडळाला विशेष गाड्यांची विनंती केली होती. त्यानूसार रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.कोकण रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते सावंतवाडी,मडगाव आणि कोल्हापुर ते सावंतवाडी तर मध्य रेल्वेवर सोलापुर, पुणे, अहमदनगर, नाशिक, भुसावळ, नागपुर ते मुंबई, पुणे-हैद्राबाद, कोल्हापुर-नागपुर, पुणे-नागपुर, अमरावती-नागपुर, जळगाव-नागपुर, पनवेल-नागपुर, अहमदनगर-नागपूर, अकोला-नागपुर, मुंबई-हैद्राबाद दरम्यान या स्पेशल ट्रेन चालविण्यात येणार आहेत. तर  एसटी महामंडळाने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभाग नियंत्रकाना जिल्हावार बसेस सोडण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

या आहे गाड्या

०११३५ सीएसएमटी-सावंतवाडी ट्रेन ४ आणि ६ सप्टेंबर रोजी रात्री १० वा, ०११४७ सीएसएमटी-मडगाव ट्रेन सकाळी ११.०५वा, ०११४९ कोल्हापुर- मडगाव ट्रेन संध्याकाळी ७.३० वा, ०२१५४ सोलापुर-सीएसएमटी ट्रेन रात्री १०.४०वाजता, ०११३० पुणे-सीएसएमटी ट्रेन रात्री ११.५०वा, ०११३२ अहमदनगर-सीएसएमटी ट्रेन रात्री ९ वा,०११३४ नाशिक-सीएसएमटी ट्रेन रात्री ११.४५वा, ०२१७२ भुसावळ -सीएसएमटी ट्रेन रा.९.१५ वा,०११५५ पुणे-हैद्राबाद ट्रेन दुपारी २.१५ वा,०११३७ कोल्हापुर-नागपुर ट्रेन सकाळी ८.०५ वा, ०२१५९ पुणे-नागपुर ट्रेन दुपारी ४.१५वा, ०२१६१ सीएसएमटी-नागपुर ट्रेन संध्याकाळी ५.१५वा,०२१६३ नाशिक रोड- नागपुर ट्रेन दुपारी ४.१०वा, ०२१६५ जळगाव-नागपुर ट्रेन रात्री.९.३०वा, ०२१६७ अहमदनगर- नागपुर ट्रेन दुपारी ४ वा, ०२१६९ पनवेल-नागपुर ट्रेन दुपारी १.५०वा, ०११४५ पुणे-अहमदाबाद संध्याकाळी ५.३०वा,०११५१ कोल्हापूर- धारवाड ट्रेन रात्री १० वा, ०११५३ पुणे-धारवाड ट्रेन संध्याकाळी ५.०५वा, ०११५७ एलटीटी-हैद्राबाद ट्रेन दुपारी २ वाजता सुटणार आहे. या गाड्या ५ सप्टेंबरर रोजी धावणार आहेत. याशिवाय ०११३९ अमरावती-नागपुर मेमू ट्रेन रात्री १२.१० वा, ०११४१ अकोला-नागपुर मेमू ट्रेन रात्री १२.३०वा, ०११४३ बल्लारशहा- नागपुर मेमू ट्रेन रात्री १२.३० वाजता चालविण्यात येणार आहेत.या गाड्या ६ सप्टेंबर रोजी धावणार आहेत. विद्यार्थी या गाड्यांचे आरक्षण आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरुन करु शकतात.


हे ही वाचा – Salman is Married, त्याला १७ वर्षाची मुलगी, झूम व्हिडिओत धक्कादायक खुलासा!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -