नागपुरच्या उमरेड मार्गावर भीषण अपघात; कार ट्रकच्या धडकेत सात जणांचा मृत्यू

नागपुरच्या उमरेड मार्गावरील उमरगाव फाट्याजवळ भरधाव तवेरा ट्रकवर आदळून भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

नागपुरच्या उमरेड मार्गावरील उमरगाव फाट्याजवळ भरधाव तवेरा ट्रकवर आदळून भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अघातात सात जणांचा मृत्यू झाला असून, एक लहान मुलगी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते.

शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास राम कुलर कंपनीजवळ हा भीषण अपघात झाला. एमएच ४९/ ४३१५ क्रमांकाच्या तवेरा कारमध्ये बसून नागपुरातील एका महिलेसह सात जण उमरेड मार्गाने जात होते. समोर एक ट्रक होता. तवेराचा वेग मर्यादित वेगापेक्षा जास्त होता. अशात चालकाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकला जोरदार धडक दिली. त्यामुळे तवेराचा समोरचा भाग पुरता चक्काचूर होऊन आतमधील सात जण ठार झाले. तर एक बालिका गंभीर जखमी झाली.

त्यावेळी संबंधित मार्गावरील उपस्थितांनी या अपघाताची पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्यानंतर रात्री ११ वाजताच्या सुमारास हुडकेश्वर पोलिस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत जखमी बालिकेला इस्पितळात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी अपघात कसा झाला त्याबद्दलची चौकशी सुरू केली. मात्र तोपर्यंत प्रत्यक्षदर्शी निघून गेल्याने नेमका अपघात कसा झाला त्याबद्दलची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.


हेही वाचा – कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेला झटका, माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश