Gram Panchayat Election : सरपंचपदाच्या उमेदवाराची निवडणूक खर्चाच्या मर्यादेत वाढ

यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच नागरिकांमधून सरपंचांची निवड होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू झाली असून, यंदा ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उभे राहणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणूक खर्चाच्या मर्यादेत राज्य निवडणूक आयोगाने सुधारणा केली.

यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच नागरिकांमधून सरपंचांची निवड होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू झाली असून, यंदा ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उभे राहणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणूक खर्चाच्या मर्यादेत राज्य निवडणूक आयोगाने सुधारणा केली. त्यानुसार, असलेली सरसकट २५ हजार रुपये खर्चाची मर्यादा आता वाढविण्यात आली आहे. (Spending For Gram Panchayat Election Limit Fixed By Number Of Members State Election Commission Mumbai)

सरपंच पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारासाठीही खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सदस्य आणि सरपंच ही पदे सर्व प्रभागांकरीता सामायिक असून प्रत्येक प्रभागातून या सामाईक पदासाठी मतदान होणार आहे.

याचा विचार करता सरपंचपदाच्या उमेदवारास ग्रामपंचायतींच्या सर्व प्रभागांमध्ये प्रचारासाठी संपर्क करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रभाग संख्येच्या प्रमाणात सरपंचपदाच्या उमेदवाराची निवडणूक खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत सदस्यनिहाय खर्चाची मर्यादा (रुपयांमध्ये)

  • ७ ते ९ : २५,०००
  • ११ ते १३ : ३५,०००
  • १५ ते १७ : ५०,०००

सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी

  • ७ ते ९ : ५०,०००
  • ११ ते १३ : १,००,०००
  • १५ ते १७ : १,७५,०००

हेही वाचा – Gujarat Election 2022 : पहिल्या टप्प्यात आज 89 जागांसाठी मतदान, 788 उमेदवार रिंगणात