घरमहाराष्ट्रमहाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन, क्रीडा मंत्री  सुनील केदार यांची माहिती

महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन, क्रीडा मंत्री  सुनील केदार यांची माहिती

Subscribe

विविध खेळांना उत्तेजन देण्यासाठी आणि खेळाडूंना स्पर्धात्मक अनुभव मिळावा यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सहकार्याने मिनी ऑलिपीक स्पर्धा आयोजित करण्याचे प्रस्तावित होते.याचा लाभ दिव्यांग खेळाडूंच्या क्रीडा प्रोत्साहन देण्यास देखील होणार आहे.

राज्यात क्रीडामय वातावरण निर्माण करून विविध खेळांना उत्तेजन देण्याच्या दृष्टीने तसेच खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हावी आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या दृष्टीने खेळाडूंची तयारी व्हावी याकरिता राज्यात “महाराष्ट्र स्टेट ऑलिम्पिक गेम्स” चे आयोजन महाराष्ट्र शासन तसेच  महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २०२२ या वर्षामध्ये मध्ये करण्यात येणार असून यासंबंधी शासन निर्णय जारी करण्यात आला असल्याची माहिती क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी शुक्रवारी दिली.

राज्यात क्रीडामय वातावरण निर्माण करून विविध खेळांना उत्तेजन देण्याच्या दृष्टीने तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर आपले नैपुण्य दाखवित असलेल्या खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हावी. राष्ट्रीय खेळ स्पर्धेच्या दृष्टीने खेळाडूंची तयारी व्हावी याकरिता महाराष्ट्र ऑलिम्पीक असोशिएशनमार्फत राज्यात विविध ठिकाणी मिनी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजीत करण्याचा निर्णय  घेण्यात आला असल्याचे केदार यांनी सांगितले.

- Advertisement -

विविध खेळांना उत्तेजन देण्यासाठी आणि खेळाडूंना स्पर्धात्मक अनुभव मिळावा यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या सहकार्याने मिनी ऑलिपीक स्पर्धा आयोजित करण्याचे प्रस्तावित होते.याचा लाभ दिव्यांग खेळाडूंच्या क्रीडा प्रोत्साहन देण्यास देखील होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आता या स्पर्धाचे आयोजन महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने सुरक्षा, वैद्यकीय सुविधा, खेळाडुंच्या प्रवासाची साधने इ. बाबी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. यासाठी राज्यस्तरावर एक उच्चस्तरीय समिती आणि पुणे येथे मुख्य स्पर्धा आयोजन समिती अशा दोन समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. राज्यस्तरावर  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याची माहितीही केदार यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -